-
श्रीनगरच्या (Srinagar) प्रसिद्ध अशा लालचौक (Lal Chowk) येथे शुक्रवारी या हंगामातील पहिली हिमवृष्टी झाली. त्यामुळे पर्यटक सुखावले होते.
-
श्रीनगर शहरात ठिकठिकाणी बर्फाची चादर पसरल्याचे दृश्य होते.
-
दरम्यान बारामुल्ला जिल्ह्यातही शुक्रवारी पुन्हा हिमवृष्टी झाली.
-
काश्मीरमध्ये ३० डिसेंबरपर्यंत अशीच स्थिती राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
-
हिमवृष्टीने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
-
जलवाहिन्यांमध्ये बर्फ साठल्याने श्रीनगर शहरातील काही भागांत पाणी पुरवठा झाला नाही.
-
शुक्रवारी श्रीनगरमध्ये उणे ७.३ तापमानाची नोंद झाली.
-
श्रीनगरमध्ये हिमवृष्टीचा पर्यटकांनी मनसोक्त आनंद लुटला.
-
(सर्व फोटो सौजन्य : ANI)

Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”