-
Uddhav Thackeray-Raj Thackeray Rally Updates: हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी (Shiv Sena UBT) शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या (Maharashtra Navnirman Sena) वातीने आज, शनिवारी जल्लोष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
-
जवळपास दोन दशकांनंतर (Two Decades) उद्धव (Uddhav Thackeray) आणि राज हे ठाकरे (Raj Thackeray) बंधू एकत्र येत आहेत.
-
ठाकरे बंधूंची ही एकी कायम राहते का, याचीच राजकीय वर्तुळात साऱ्यांना उत्सुकता आहे.
-
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात अंमलबजावणी करताना त्रिभाषा सूत्र महायुती सरकारने स्वीकारले होते.
-
यानुसार तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य करण्याचा शासकीय आदेश १६ एप्रिल रोजी काढण्यात आला होता.
-
हिंदी सक्तीवरून बरीच ओरड झाल्यावर तो मागे घेण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी केली होती.
-
यानंतर १७ जूनला त्रिभाषा लागू करण्याचा दुसरा आदेश काढण्यात आला.
-
या विरोधात शनिवारी (५ जुलै) मोर्चा काढण्याचे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर केले होते.
-
उद्धव व राज एकत्र येणाची चर्चा सुरू असतानाच राज यांच्या आवाहनानुसार उद्धव ठाकरे यांनी मोर्चाला पाठिंबा दिला.
-
वरळीतील (मुंबई) एनएससीआय डोम (Worli Dome, Mumbai) येथे हा जल्लोष मेळावा पार पडणार आहे.
-
हा विजयी मेळावा कसा असेल? कार्यक्रमाची रुपरेषा कशी असेल? या कार्यक्रमाला राज व उद्धव ठाकरे यांच्याशिवाय इतर कोणकोणते नेते उपस्थित असणार आहेत? असे प्रश्न सर्वांना पडले आहेत.
-
शिवसेना व मनसेच्या कार्यकर्त्यांनी वरळीतील एनएससीआय डोम परिसरात गर्दी केली आहे. (सर्व फोटो सौजन्य : आकाश पाटील/इंडियन एक्सप्रेस)

Horoscope Today: स्वाती नक्षत्रात नव्याने बहरणार आयुष्य; कोणाला जोडीदाराची साथ तर कोणाच्या मनात येईल आशेचा नवीन किरण; वाचा राशिभविष्य