-
शिवसेना (ठाकरे) व मनसेने आयोजित केलेल्या विजयी मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर युतीचे संकेत दिले आहेत.(Express Photo by Amit Chakravarty)
-
“राजने भाषणाच्या सुरुवातीला माझा उल्लेख सन्माननीय केला, त्यामुळे माझ्या भाषणाची सुरुवात देखील सन्माननीय राज ठाकरे अशीच आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
-
“आमच्या दोघांमधील अंतरपाठ अण्णाजीपंतांनी दूर केला. आता तुमच्याकडून अक्षता टाकण्याची अपेक्षा नाही. आम्ही दोघे एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
-
शिवसेना (ठाकरे) व मनसेच्या विजयी मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीला सन्माननीय उद्धव ठाकरे असा केला.
-
हिंदी सक्ती ही मुंबई स्वतंत्र करण्याची चाचपणी असल्याची घणाघाती टीका या मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
-
सत्ताधाऱ्यांना नेमकं काय आणि कोणासाठी करायचं आहे? असा सवाल राज ठाकरे यांनी या मेळाव्यातून विचारला.
-
“कोणाची माय व्यालीय त्यांनी महाराष्ट्राला, मुंबईला हात घालून दाखवावा. काय मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गां** नाहीयोत”, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी इशारा दिला.
-
‘तुमच्या हातात सत्ता असेल, पण ती सत्ता विधानभवनात, आमच्याकडे सत्ता रस्त्यावर आहे’, असं म्हणत राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला मोठा इशारा दिला

Devendra Fadnavis : टीकेनंतरही फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार, पण उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, “रुदाली…”