-
आज आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याबरोबर विठ्ठल रुक्मिणीची महापूजा (Shri Vitthal Rukmini MahaPooja) केली.
-
पहाटे ३ च्या दरम्यान विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या कुटुंब आणि नाशिकमधील मानाचे वारकरी उगले दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले.
-
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) दिवशी दरवर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते ही महापूजा होते.
-
या महापूजेमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तींना अभिषेक, पूजन व आरती केली जाते.
-
महापूजेनंतर फडणवीस यांनी राज्यातील जनतेसाठी सुख, समृद्धी आणि शांततेची प्रार्थना केली.
-
ही पूजा पाहण्यासाठी मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी झाली होती.
-
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
-
आषाढी एकादशीचा आनंदोत्सव पंढरपूरमध्ये साजरा होत आहे.
-
महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी वारकरी पंढरी नगरीत दाखल झाले आहेत.
-
संपूर्ण पंढरपूर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : देवेंद्र फडणवीस/इन्स्टाग्राम)

“दादा, जीव गुदमरतोय, काहीतरी कर”, आग लागलेल्या इमारतीमधून UPSC च्या विद्यार्थ्याचा भावाला शेवटचा फोन