-
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे अनावरण केले. ही ट्रेन गुवाहाटी ते कोलकातापर्यंत धावणार आहे. पुढील १५-२० दिवसांत, शक्यतो १८ किंवा १९ जानेवारीच्या सुमारास ही सेवा सुरू होईल. ही ट्रेन ताशी १८० किमी वेगाने धावू शकते.
-
आधुनिक कोच आणि आत असलेल्या सुविधांमुळे वंदे भारत स्लीपर ट्रेनमधून रात्रीचा प्रवास सुखकर होऊ शकतो. पाहा पहिली झलक. (Photo – PIB)
-
स्लीपर कोचमध्ये चेअर-कार सीटिंगऐवजी बर्थ जोडले आहेत, ज्यामुळे ट्रेन लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अनुकूल बनते. (Photo – ANI)
-
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, स्लीपर ट्रेनचे भाडे मध्यमवर्गीय प्रवाशांसाठी परवडणारे असणार आहे. ज्यामुळे विमानांपेक्षाही अधिक परवडणारा पर्याय प्रवाशांना उपलब्ध होईल. (Photo – PIB)
-
पहिली सेवा हावडा आणि गुवाहाटी दरम्यान उपलब्ध होईल. पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यात प्रवासासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होत आहे. (Photo – ANI)
-
रेल्वे भाड्यात जेवणासह थर्ड एसीसाठी सुमारे २,३०० रुपये, सेकंड एसीसाठी सुमारे ३,००० रुपये आणि फर्स्ट एसीसाठी सुमारे ३,६०० रुपये तिकीट दर असण्याची शक्यता आहे. (Photo – ANI)
-
ही सेवा पुढील १५-२० दिवसांत सुरू होण्याची अपेक्षा आहे, पंतप्रधानांकडून अंतिम मंजूरी मिळाल्यानंतर पहिल्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्याची तारीख जाहीर केली जाईल. (Photo – ANI)
-
पारंपरिक स्लीपरच्या तुलनेत ही ट्रेन वेगवान आणि अधिक आरामदायी पर्याय म्हणून समोर येईल. याच मार्गावर विमान तिकिटाचा खर्च ६,०००-८,००० रुपयांपेक्षा कमी आहे. (Photo – PIB)
-
३० डिसेंबर रोजी, वंदे भारत स्लीपर ट्रेनने कोटा-नागदा मार्गावर १८० किमी प्रतितास वेगाने धावण्याची चाचणी पूर्ण केली. (Photo: X/@AshwiniVaishnaw)
खोकला होईल बरा, घसादुखी दूर होऊन बसलेला आवाज पुन्हा येईल! फक्त ‘हा’ एक छोटा तुकडा चघळा, आजीच्या बटव्यातील उपायाने मिळू शकतो आराम