-
संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गटाच्या युतीला निर्विवाद बहुमत मिळाले. आता महापौर कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
-
२२ जानेवारी रोजी मुंबई महापौर पदाची सोडत जाहीर होणार आहे. महापौराची निवड साध्या बहुमताने होते. मुंबई महानगरपालिकेच्या २२७ सदस्यांच्या सभागृहात यासाठी किमान ११४ नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक आहे.
-
महापौरपदासाठी आरक्षणाच्या सोडतीची प्रक्रिया नगरविकास विभागाकडून अधिकृत अधिसूचना जारी केल्यानंतर सुरूच होते.
-
महापौर निवडीसाठी एक स्वतंत्र कायदेशीर प्रक्रिया अस्तित्वात असल्याने ती पूर्ण केल्यानंतरच शहराची सूत्रे कोणाच्या हाती जाणार हे निश्चित होणार आहे.
-
महापौरपद चक्राकार पद्धतीने राखीव ठेवण्याची ही व्यवस्था भारतीय संविधानातील ७४व्या घटनादुरुस्तीवर आधारित आहे. या दुरुस्तीमुळे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे. त्याअंतर्गत महापौर पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांना आरक्षण देणे अनिवार्य आहे. महानगरपालिका अधिनियमाच्या माध्यमातून राज्यात या तरतुदीची अंमलबजावणी केली जाते. समाजातील सर्व घटकांना महापौरपदावर विराजमान होण्याची संधी मिळावी असा त्यामागचा मुख्य उद्देश आहे.
-
यादरम्यान महापालिकेतील मागील कार्यकाळांचा विचार करून कोणकोणते प्रवर्ग महापौरपदासाठी पात्र आहेत, याची रोटेशन यादी अधिकाऱ्यांकडून तयार केली जाते.
-
त्यानंतर सार्वजनिक स्वरूपात सोडतीची चिठ्ठी काढून महापौरपद आरक्षित असल्याचा अंतिम निर्णय घेतला जातो. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच महानगरपालिका सभागृहाची विशेष बैठक बोलावण्यात येते.
-
या बैठकीत सोडत निश्चित झालेल्या आरक्षित प्रवर्गातील किंवा सर्वसाधारण प्रवर्गातील नगरसेवकांमधून महापौराची निवड केली जाते.
-
आरक्षणाच्या सोडतीनुसार, मुंबईचे मागील दोन महापौर हे सर्वसाधारण प्रवर्गातून निवडले गेले होते. (सर्व फोटो – लोकसत्ता टीम)
राज ठाकरेंच्या नातीचे थाटात नामकरण; अमित ठाकरेंनी कन्येचे ठेवले ‘हे’ ऐतिहासिक नाव