-
मुंबई महापालिकेत यंदा महापौर पद हे सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव असल्याची सोडत जाहीर झाल्याने भारतीय जनता पक्षाने रितू तावडे यांना महापौर पदासाठी उमेदवारी दिली होती. त्यानुसार, आज त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
-
मुंबई महापालिकेच्या ९४ वर्षांच्या इतिहासात आठव्यांदा मुंबईला महिला महापौर मिळणार आहे.
-
१९५६ साली काँग्रेस पक्षाच्या सुलोचना मोदी या पहिल्यांदा मुंबईच्या पहिल्या महिला महापौर बनल्या होत्या.
-
१९५६ नंतर १९९४ पर्यंत एकही महिला महापौर बनली नाही. थेट १९९४-९५ च्या कार्यकाळात काँग्रेसच्याच निर्मला सामंत प्रभावळकर या दुसऱ्या महिला महापौर बनल्या.
-
यानंतर १९९७-९८ च्या काळात शिवसेनेच्या विशाखा राऊत महापौर बनल्या.
-
२००७-२००९ या कार्यकाळात शिवसेनेच्याच शुभा राऊळ यांना महापौर पदी विराजमान करण्यात आले.
-
२००९-१२ या काळात शिवसेनेच्या श्रद्धा जाधव यांच्याकडे मुंबई महापालिकेची धुरा होती. त्या आता प्रभाग क्रमांक २०२ च्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.
-
२०१४ ते २०१७ या काळात शिवसेनेच्या स्नेहल आंबेकर यांनी मुंबई महापालिकेचा कारभार सांभाळला. त्या आता प्रभाग क्रमांक १९८ च्या नगरसेविका आहेत.
-
तर, २०१९ ते २२ च्या काळात शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेत महापौर पद सांभाळालं. तर, सध्या त्या प्रभाग क्रमांक १९९ च्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.
-
दरम्यान, यावेळेही मुंबई महापालिकेत महिला आरक्षणाची सोडत जाहीर झाली. मुंबई महापालिकेत भाजपाला बहुमत मिळालं असून भाजपाच्या ४९ नगरसेविका निवडून आल्या आहेत.
-
तर, भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेच्या १९ नगरसेविका निवडून आल्या.
-
त्यानुसार, भाजपाच्या रितू तावडे या आठव्या महिला महापौर ठरल्या आहेत.
Iran Israel War IT Sector Impact: इराण युद्धामुळं आता ‘आयटी’ उद्योगही संकटात! ॲमेझॉन कंपनीवरील हल्ल्यामुळे चिंतेचे वातावरण का?