-
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे काल (२८ जानेवारी) विमान अपघातात अकाली निधन झाले.
-
त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून, आज बारामती येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
-
बारामती येथे विमान उतरत असताना झालेल्या भीषण अपघातात अजित पवार यांनी जगाचा निरोप घेतला.
-
त्यांच्या अशा जाण्याने राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांतून हळहळ व्यक्त होत आहे.
-
‘दादां’चे अंत्यदर्शन घेण्यासाठी बारामतीत जनसागर लोटला होता.
-
विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर हजारो कार्यकर्त्यांच्या आणि चाहत्यांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामतीत दाखल होऊन अजित पवार यांना अखेरची मानवंदना दिली.
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
-
तसेच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पवार कुटुंबीयांची भेट घेत आपल्या भावना व्यक्त केल्या.
-
(सर्व फोटो सौजन्य : ANI/युट्यूब)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
