-
Baramati Plane Crash: बारामती येथे अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू झालेल्या फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी (Pinki Mali) यांच्यावर आज, २९ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतील वरळी येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यसंस्कार करण्यात आले. (सर्व फोटो – आकाश पाटील, इंडियन एक्सप्रेस)
-
पिंकी माळी यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
-
पिंकी माळी यांना अखेरचा निरोप देताना त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार अत्यंत भावूक झाले होते.
-
समाजातील सर्वच स्तरांतून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला जात असून, कुटुंबाने अत्यंत सन्मानपूर्वक पद्धतीने हा अंत्यविधी पार पाडला.
-
प्रभादेवीच्या सेंच्युरी बाजाराजवळील हसू तांडेल मार्ग, सेंच्युरी मिल म्हाडा कॉलनी येथे पिंकी यांचे कुटुंब वास्तव्यास आहे.
-
पिंकी यांचे वडील शिवकुमार माळी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते असून त्यांनी टॅक्सी चालवून मोठ्या जिद्दीने कुटुंबाचा उदरनिर्वाह केला.
-
प्रतिकूल परिस्थितीत शिवकुमार माळी यांनी पिंकीला शिक्षण दिले.
-
इयत्ता १२ वीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी फ्लाईट अटेंडंटचे प्रशिक्षण घेतले.
-
१२ वीनंतर फ्लाईट अटेंडंटचे प्रशिक्षण पूर्ण करून गेल्या पाच वर्षांपासून त्या ‘व्हीसीआर व्हेंचर्स’ कंपनीत कार्यरत होत्या.
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
