-
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे बुधवारी (२८ जानेवारी) विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले.
-
आज, गुरुवारी (२९ जानेवारी) बारामतीमधील (Baramati) विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
-
बुधवारी सकाळी बारामती विमानतळावर उतरताना अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला.
-
आज बारामतीमध्ये शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
-
यावेळी अजित पवार यांचे पुत्र पार्थ आणि जय पवार, पत्नी सुनेत्रा पवार आणि पवार कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.
-
त्यांनी अत्यंत जड अंतःकरणाने अजित दादांना अखेरचा निरोप दिला.
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर अनेक दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते.
-
अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.
-
(सर्व फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
