-
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली निधन झालं. २८ जानेवारी रोजी विमान अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. (सर्व फोटो – Arul Horizon)
-
अपघातानंतर अवघ्या राज्यावर संकट कोसळलं. संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली. आज २९ जानेवारी रोजी त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना मुखाग्नी दिला.
-
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचं वृत्त समजताच त्यांच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. पण अशा परिस्थिती खचून न जाता खासदार सुप्रिया सुळे यांनी घरातील कर्त्या स्त्रीची भूमिका निभावली.
-
अचानक कोसळलेल्या या संकटात सगळ्यांनाच धक्का बसला होता. पण सुप्रिया सुळे यांनी स्वतः जातीने लक्ष दिलं आणि प्रत्येकाचं सांत्वन केलं.
-
सुनेत्रा पवारांसाठी कालचा दिवस म्हणजे अत्यंत काळा दिवस ठरला. पण या परिस्थिती त्यांना सुप्रिया सुळेंनी खंबीर पाठिंबा दिला. दिल्लीहून बारामतीत पोहोचेपर्यंत आणि बारामतीत आल्यानंतरही त्यांच्यासोबत त्या सदैव होत्या. अंत्य दर्शनाला जाताना त्यांनी सुनेत्रा वहिनींचा हात हातात अगदी घट्ट पकडला होता.
-
काही कळायच्या आतच अजित पवारांच्या निधनाची बातमी समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला. पण तरीही त्यांना शेवटचा निरोप द्यावा लागलाच. सुनेत्रा पवारांना यावेळी अश्रू अनावर झाले. आपल्या जोडीदाराला अखेरचं पाहताना त्यांचा कंठ दाटून आला होता.
-
सर्वांचं सांत्वन करत असताना सुप्रिया सुळेंनाही अश्रू अनावर झाले. दादांचं शेवटचं दर्शन घेताना त्यांच्याही भावनेचा बंध फुटला आणि त्याही धायमोकलून रडू लागल्या.
-
पवार कुटुंबियांवर हा सर्वांत मोठा आघात आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सुप्रिया सुळे खंबीरपणे उभ्या राहिल्या.
-
एवढंच नव्हे तर अंत्यसंस्काराचं नियोजन करण्यापासून प्रत्येकाच्या भेटी घेऊन सांत्वन स्वीकारण्यापर्यंत सुप्रिया सुळेंनी सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या.
याला म्हणतात नशीब! ६ फेब्रुवारी तारीख ५ राशींचं नशीब पालटणारी, पॉवरफुल नवपंचम योगानं पैसा दुप्पट, धनलाभाचे संकेत आजपासूनच..
