-
Sunetra Pawar Oath Taking Ceremony: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत अकाली निधन झाले. त्यांच्या अपघाती निधनानंतर आता सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. (सर्व फोटो – आकाश पाटील, इंडियन एक्सप्रेस)
-
उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुनेत्रा पवार मुंबईत दाखल झाल्या होत्या.
-
आज (३१ जानेवारी) सायंकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार यांनी लोकभवन येथे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
-
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते.
-
सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
-
दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.
-
त्या प्रस्तावाला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलं आणि त्यानंतर सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.
-
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गटनेता निवडीचे पत्र सादर करण्यात आले आहे.
-
याबरोबरच सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत.
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
