-
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झालं. मुंबईहून बारामतीकडे प्रचारसभांकरता अजित पवार निघाले होते. मुंबईहून उड्डाण घेतलेलं विमान बारामतीत व्यवस्थित पोहोचलं, पण बारामतीत लँडिग होत असताना वैमानिकांसमोर काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, परिणामी विमान लँडिग होत असताना अपघात झाला आणि अजित पवारांसह विमानातील पाचही जण या अपघातात मृत्युमुखी पडले. (फोटो – Arul Horizon )
-
अजित पवारांच्या अचानक जाण्याने अवघ्या राज्यावर शोककळा पसरली. अजित पवारांचं विमान कोसळल्याचं स्थानिकांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेवढ्यात अग्निशमन दलही पोहोचले. परंतु, कोणतीही मदत मिळण्याआधीच अजित पवारांसह सर्वजण हे जग सोडून गेले होते. (फोटो – Arul Horizon )
-
घड्याळ आणि गॉगलवरून अजित पवारांना स्थानिकांना ओळखलं. त्यानंतर लागलीच अवघ्या राज्यभर ही बातमी पसरली. (फोटो – Arul Horizon)
-
देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या. विमान अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी होऊ लागली. त्यानतंर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदन सादर केलं. ((फोटो – देवेंद्र फडणवीस/X)
-
दरम्यान, अजित पवारांचं पार्थिव बारामती मेडिकल कॉलेज येथे नेण्यात आलं. त्यामुळे बारमतीच्या दिशेने राज्यातील कार्यकर्त्यांची पावलं धावू लागली. काही तासांतच बारामती रुग्णालयाबाहेर हजारोंचा जनसमुदाय जमा होऊ लागला. या घटनेची माहिती जाणून घेण्याकरता सर्व नेतेमंडळीही पुण्याच्या दिशेने रवाना झाले. (फोटो – Arul Horizon)
-
दिल्लीत असलेले सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारही बारामतीत पोहोचल्या. त्यांना बारामतीत उतरताच अश्रू अनावर झाले. दोघीही एकमेकींच्या गळ्यात हमसून हमसून रडताना अवघ्या राज्याने पाहिलं. (फोटो – Arul Horizon)
-
अजित पवारांचं राजकीय वलय आणि इतर सोपस्कार पार पाडण्याकरता २९ जानेवारी रोजी अंत्यसंस्कार करण्याचे नियोजन करण्यात आले. त्याआधी सर्वांना अजित पवारांच्या पार्थिवाचं दर्शन घेता यावं याकरता अंत्यदर्शन आणि अंत्ययात्रेचेही नियोजन करण्यात आले. (फोटो – Arul Horizon)
-
त्यानुसार, २८ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून बारामतीतील विद्याप्रतिष्ठान येथे अजित पवारांचं पार्थिव ठेवण्यात आलं. तेथे हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले. (फोटो – Arul Horizon)
-
त्यानुसार, २८ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून बारामतीतील विद्याप्रतिष्ठान येथे अजित पवारांचं पार्थिव ठेवण्यात आलं. तेथे हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले. (फोटो – Arul Horizon)
-
दुसऱ्या दिवशी सकाळी अजित पवारांचं पार्थिव अजित पवारांच्या मूळ निवासस्थानी म्हणजे काटेवाडीत नेण्यात आलं. येथे कुटुंबियांनी अजित पवारांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. तेथून पुन्हा अंत्ययात्रा निघून पार्थिव विद्याप्रतिष्ठान येथे आणण्यात आले. सकाळी ११ वाजल्यापासून त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. अजित पवारांचा सुपूत्र पार्थ पवार यांनी अजित पवारांना मुखाग्नी दिला. तेव्हा त्यांच्या कुटुंबियांसहित सर्वांनी हंबरडा फोडला. (फोटो – Arul Horizon)
-
अजित पवारांचं निधन झाल्याने त्यांचं उपमुख्यमंत्रीपदासहित अनेक पदे रिक्त झाली आहेत. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष होते. या पक्षाची जबाबदारी कोणीतरी घेणं गरजेचं होतं. त्याकरता अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी आता नेतृत्व करावं अशी इच्छा व्यक्त होऊ लागली. (फोटो – Arul Horizon)
-
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरू असतानाच सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार असे वृत्त झळकू लागले. अजित पवारांनी वाढवलेल्या पक्षासाठी पुढाकार घेण्याची वेळ आल्याने सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याची जबाबदारी दर्शवली. अवध्या चौथ्याच दिवशी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारणं घाईचं ठरेल असंही दबक्या आवाजात अनेकांनी म्हटलं. (फोटो – Arul Horizon)
-
दरम्यान, या चर्चेत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनाकरणासंबंधातील १७ जानेवारी रोजी झालेल्या एका बैठकीचा कथित व्हिडीओही समोर आला. परंतु, ही बैठक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात झाली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे सुनील तटकरे म्हणाले. तर, या बैठकीत विलिनीकरणासंदर्भात अंतिम निर्णय झाला असल्याची माहिती शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील यांनी दिली. (फोटो – Akash patil)
-
ही चर्चा सुरू असतानाच सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीच्या तयारीला जोर आला. परंतु, याबाबत आम्हाला काहीच माहिती नसल्याची प्रतिक्रिया शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी दिली. (फोटो – Akash patil)
-
अखेर, आज ३१ जानेवारी रोजी, सायंकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्र राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या. (फोटो – Akash patil)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
