-
महाशिवरात्रीनिमित्त आज शिर्डीत भक्तांची मांदियाळी जमा झाली होती. यावेळी भाविकांसाठी खिचडीच्या महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. तसंच, विविध धार्मिक कार्यक्रमही पार पडले. (सर्व फोटो – RNO)
-
महाशिवरात्रीनिमित्त शिर्डीतील श्री साईबाब संस्थान विश्वस्थ व्यवस्थेच्या वतीने यंदाही काकडी आरती संपन्न झाली. तसंच, विविध कार्यक्रमामुळे आज शिर्डीत गर्दी झाली होती.
-
यानंतर श्रींचे मंगलस्नान होऊन शिर्डी माझे पंढरपूर आरती गायन झाले.
-
तसेच महाशिवरात्री निमित्त संस्थानच्या श्री साईप्रसादालयात अंदाजे ६० ते ६५ हजार साईभक्त मोफत प्रसादरुपी शाबुदाणा खिचडीचा लाभ घेतील असे नियोजन करण्यात आले आहे.
-
याकरीता सुमारे ५५ पोते शाबुदाणा, ४००० किलो शेंगदाणे, ७०० किलो शेंगदाणा तेल व २००० किलो बटाटा वापरण्यात आले.
-
या सर्व साहित्यापासून एकूण १३ हजार किलो महाप्रसाद तयार करण्यात आला असून भाविक मोठ्या भक्तिभावानं आस्वाद घेत आहेत.
-
शिर्डीतील साई संस्थानतर्फे चालवल्या जाणार्या प्रसादालयात नियमित प्रसाद वाटप सुरू असते. रोज दोन भाजी, चपाती आणि वरण-भात असा प्रसाद दिला जातो.
-
मात्र, आषाढी एकादशी आणि महाशिवरात्रीदिनी उपवासानिमित्त विशेष साबुदाण्याची खिचडी आणि झिरक्याचा प्रसाद देण्याची प्रथा आहे.
-
हा महाप्रसादही भक्तमंडळी अगदी भक्तीभावाने ग्रहण करत असतात.
तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल
