-
मुंबई महापालिकेत रितू तावडे या महापौरपदी विराजमान झाल्यानंतर आता किशोरी पेडणेकर या विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी घेणार आहेत.
-
या निमित्ताने त्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या ठरल्या आहेत. २००० सालापासून विरोधी पक्षनेते पद अस्तित्वात आले असून गेल्या पंचवीस वर्षातील किशोरी पेडणेकर या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या आहेत.
-
महापौर पदी महिला आणि विरोधी पक्षनेते पदीही महिला असा महिला राज मुंबई महापालिकेत येत्या काळात बघायला मिळणार आहे.
-
आधी महापौर आणि मग विरोधी पक्षनेत्या असाही योग त्यांच्याबाबतीत आला आहे. आतापर्यंत काँग्रेसकडे असलेले हे पद प्रथमच शिवसेना (ठाकरे) पक्षाकडे जाणार आहे.
-
दरम्यान, २००० ते २००३ या काळात खा. मो.हा. अ. बस्तीवाला हे मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते होते.
-
त्यानंतर २००३-२००४ मध्ये गुणवंत शेठ यांनी ही जबाबदारी पार पाडली.
-
२००४-२०१२ या आठ वर्षांत राजहंस सिंह मुंबई महापालिकेचे विरोधी पक्ष नेते होते.
-
२०१२ – २०१३ मध्ये ज्ञानराज निकम विरोधी पक्षनेते होते.
-
२०१३ -२०१६ मध्ये देवेंद्र (बाळा) आंबेरकर विरोधी पक्ष नेते राहिले.
-
२०१६ -२०१७ प्रवीण छेडा यांनी ही जबाबदारी घेतली.
-
२०१७ – २०२२ या काळात रवी राजा काँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्षनेते होते. सध्या ते भाजपात आहेत.
प्रफुल पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट, पवार म्हणाले; “आपण १० तारखेनंतर एकत्र बसू”