-
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोकसभेत प्रसिद्ध नाना पटेकर यांना अश्रू अनावर झाले. त्यांना शोकसभेत फार बोलवलं गेलं नाही. त्यामुळे जास्त काही न बोलता अजित पवारांच्या प्रतिमेला अभिवादन करून ते व्यासपीठावरून खाली उतरले.(फोटो – लोकसत्ता टीम)
-
दरम्यान, यानिमित्ताने अजित पवार आणि नाना पाटेकर यांच्यातील ऋणानूबंध अवघ्या राज्यासमोर आला. पडद्यामागे आणि कॅमेऱ्याच्या पलीकडे या दोघांमध्ये चांगले वैयक्तिक संबंध होते. (फोटो – मल्हार पाटेकर)
-
मी अजित पवारांना ५० वर्षांपासून ओळखतोय असंही नाना पाटेकर म्हणाले. दादा कार्यकर्ते होते, मी कधी बारामतीला गेलो तर माझी सगळी उठबस दादा पाहत होते, असं नाना पाटेकर म्हणाले. (फोटो – मल्हार पाटेकर)
-
अजितदादा तेव्हा १८-१९ वर्षाचे असतील मी २५ आणि शरद पवार ३५ वर्षांचे असतील. ५० वर्षांचा खूप मोठा सहवास आहे. खूप जास्त आठवणी आहेत, असंही नाना पाटेकर भावूक होत म्हणाले होते. (फोटो – मल्हार पाटेकर)
-
नाना पाटेकरांनी आज अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. याबाबत ते म्हणाले, सुनेत्रा पवारांचं दुःख आपण घेऊ शकत नाही. कारण त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसंच त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. तीही त्यांना आता सांभाळावी लागणार आहे. (फोटो – मल्हार पाटेकर)
-
अजित पवार १९-२० वर्षांचे असल्यापासून माझे मित्र आहेत. ते कार्यकर्ते असल्यापासून मी त्यांना ओळखतो. एखादा माणूस मोठा झाला की त्यांच्या मैत्रीविषयी बोललं जातं. पण आता ते हयात नाहीत, त्यामुळे आता त्याबद्दल न बोललेलं बरं, असं नाना पाटेकर म्हणाले. (फोटो – मल्हार पाटेकर)
-
पण त्यांनी ज्या पद्धतीने सुरुवात केली, आणि ते जिथे पोहोचली तो कमाल प्रवास होता. बाकी राजकीय बाजूला राहुद्यात. मला कायम त्यांची आठवण येईल, ते उत्तम मित्र होते. माझ्या लहान भावासारखे होते, असंही ते म्हणाले. (फोटो – मल्हार पाटेकर)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…