-
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या दोन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं इस्रायलमध्ये बुधवारी जंगी स्वागत करण्यात आलं. (Photo-Narendra Modi/X)
-
पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू हे त्यांची पत्नी सारा यांच्यासह बेन गुरियन विमानतळावर उपस्थित होते. (Photo-Narendra Modi/X)
-
पंतप्रधान मोदींनी इस्रायलच्या संसदेला संबोधित करत विविध महत्वाच्या विषयांवर भाष्य केलं. ‘भारत आता आणि भविष्यातही इस्रायलबरोबर खंबीरपणे उभा आहे’, असा विश्वास मोदींनी इस्रायलमध्ये बोलताना व्यक्त केला.(Photo-Narendra Modi/X)
-
पंतप्रधान मोदींचा गेल्या नऊ वर्षांतील इस्रायलचा हा दुसरा दौरा आहे. जुलै २०१७ मध्ये मोदी इस्रायलमध्ये आले होते. त्या वेळी दोन्ही देशांतील संबंधांना सामरिक भागीदारीचा दर्जा देण्यात आला होता. (Photo-Narendra Modi/X)
-
पंतप्रधान मोदी आणि नेतान्याहू गुरुवारी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करणार आहेत. इस्रायलच्या दौऱ्यापूर्वी जाताना मोदी यांनी दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होतील, याची खात्री व्यक्त केली होती.(Photo-Narendra Modi/X)
-
गाझा शांतता योजनेला पाठिंबा : इस्रायलच्या ‘क्नेसेट’मध्ये ऐतिहासिक भाषण करताना पंतप्रधान मोदींनी गाझा शांतता योजनेला पूर्ण पाठिंबा दर्शवला. ७ ऑक्टोबरच्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत, भारताने दहशतवादाविरुद्ध इस्रायलच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.(Photo-Narendra Modi/X)
-
इस्रायलचे सर्वोच्च कायदेमंडळ असलेल्या ‘क्नेसेट’मध्ये केलेल्या ऐतिहासिक भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी गाझा शांतता योजनेला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. हा करार न्याय आणि टिकाऊ शांततेचा मार्ग असल्याचे मोदी म्हणाले. (Photo-Narendra Modi/X)
-
इस्रायलच्या ‘क्नेसेट’मध्ये भाषण करणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. यावेळी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू आणि इतर अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. (Photo-Narendra Modi/X)
-
यावेळी पंतप्रधानांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर दोन्ही देश एकत्र असल्याचे सांगितले. इस्रायलप्रमाणेच भारतानेही अनेक दहशतवादी हल्ले सहन केल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.(Photo-Narendra Modi/X)
-
पंतप्रधान मोदी पदकाने सन्मानित : पंतप्रधान मोदींनी इस्रायलच्या संसदेला संबोधित केलं. त्यानंतर मोदींना इस्रायलच्या ‘स्पीकर ऑफ द क्नेसेट’ पदकाने सन्मानित करण्यात आलं. हा मान मिळवणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.(Photo-Narendra Modi/X)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…