-
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठ्या प्रमाणात लष्करी हल्ले केले आहेत. त्यामुळे तणाव शिगेला पोहोचला आहे. या हल्ल्यांमुळे संपूर्ण मध्य पूर्वेत युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. (Photo Source: Reuters)
-
अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्तपणे केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे.(Photo Source: Reuters)
-
खामेनी यांच्या मृत्यूमुळे इराण आणखी आक्रमक प्रतिहल्ले करत आहे. आता अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमधील हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.(Photo Source: Reuters)
-
अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूचे पडसाद थेट पाकिस्तानात उमटले आहेत. पाकिस्तानच्या कराचीमधील अमेरिकन दूतावासावर जमावाने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.(Photo Source: Reuters)
-
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटलं की, ही कारवाई अनेक महिन्यांच्या नियोजनाचा भाग होती आणि इराणच्या आक्रमक धोरणांना आणि त्यांच्या अणुकार्यक्रमाला रोखण्यासाठी होती. (Photo Source: Reuters)
-
इराणने या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच इराणने इस्रायल आणि अमेरिकेच्या हवाई तळांवर प्रतिहल्ले केले आहेत. जर हल्ले सुरूच राहिले तर ते आणखी कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा इराणने दिला.(Photo Source: Reuters)
-
डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा : “इराणने म्हटलं की ते आज खूप मोठा हल्ला करणार आहेत. जो त्यांनी (इस्रायल-अमेरिकेने) यापूर्वी कधीही पाहिला नसेल. मात्र, इराणने असं करून नये. जर इराणने असं केलं तर आपण त्यांच्यावर अतिशय शक्तिशाली हल्ला करू, ज्याची इराणने कधी कल्पना केली नसेल”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं.(Photo Source: Reuters)
-
डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटलं की, “अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे राबवलेल्या मोहिमेत इराणचे सर्वोच्च नेते खामेनी ठार झाले. इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तीला आम्ही ठार केलं. आता इराणच्या जनतेने रस्त्यावर उतरावं आणि आपला देश ताब्यात घ्यावा.”(Photo Source: Reuters)
-
इराणने दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आणि त्याच्या शेजारील ऐतिहासिक बुर्ज अल अरब हॉटेलच्या परिसरालाही लक्ष्य करण्यात आलं आहे. तसेच अमेरिकेच्या हवाई तळ असलेल्या ठिकानांनाही इराणने लक्ष्य करत प्रतिहल्ले केले आहेत.(Photo Source: AP)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…