-
मुंबईत होळी साजरी करण्याची फार जुनी परंपरा आहे. होळीबरोबर येणाऱ्या रंगपंचमीसाठीही मुंबईकर उत्सुक असतात.
-
कोणी आपल्या चाळीत,तर कोणी आपल्या सोसायटीत रंगपंचमी खेळतो.
-
गेल्या काही वर्षांपासून मैदानात एकत्र जमून रंगपंचमी खेळण्याची परंपरा सुरू झाली आहे.
-
विविध कॉलेज, ऑफिसचे मित्र मैत्रिणी एका मैदानावर जमून सामूहिक रंगपंचमी साजरी करतात. अशाचप्रकारे शिवाजी पार्क येथेही रंगपंचमी साजरी करण्यात आली.
-
या रंगपंचमीत अबालवृद्ध सहभागी होऊन रंगपंचमीचा सण साजरा करतात
-
विविध रंगांनी तरुण मंडळी एकमेकांना उत्साहात रंग लावतात.
-
पर्यावरणपूरक होळी खेळण्याचे आवाहन करण्यात आल्याने अनेकजण फक्त सुक्या आणि इको फ्रेंडली रंगांचाच वापर करून रंगपंचमी खेळतात.
-
बाजारात उपलब्ध असलेल्या नवनवीन प्रकाराच्या पिचकाऱ्या घेऊन लहान मुलंही या सणात आनंदाने सहभागी होतात.
-
रंगांची उधळण करत हा सण आनंदाने साजरा केला जातो.
-
रंगपंचमीचा हा सण साजरा करण्यासाठी मुंबईतील विविध भागातील लोक एकत्र जमतात आणि उत्साह साजरा करतात.
-
तुम्हीही अशीच रंगपंचमी साजरी केली ना?
-
तुमचेही रंगपंचमीचे छान क्षण शेअर करायला विसरू नका. (सर्व फोटो – आकाश पाटील)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…