-
ऐन उन्हाळ्यात पुण्यातील मगपट्टा सिटीच्या रस्त्यांवर महापुरासारखे पाणीच पाणी झाले आहे.
-
मगरपट्टा सिटीच्या पाठीमागील बाजूस असलेला नवीन मोठा उजवा कालवा आज पहाटे फुटला. यामुळे रस्त्यावर पाणी शिरले आहे.
-
मगरपट्टा सिटीच्या काही भागात ड्रेनेजमधून पाणी उलट बाहेर येत असल्याने हडपसर औद्योगिक वसाहत पाण्याखाली गेली आहे.
-
कालवा फुटल्याने मगरपट्टा सिटी, हडपसर इंडस्ट्रीअल विभाग आणि कीर्तने बागेपर्यंतचा वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.
-
आज पहाटे सहाच्या सुमारास मगरपट्टा सिटीच्या मागच्या बाजूला असलेला कालवा किरकोळ प्रमाणात झिरपत होता.
-
मात्र, नंतर ड्रेनेज अॅक्वाडक्टमुळे भराव आतून कमकुवत झाला.
-
परिणामी पाण्याचा प्रवाह वाढत गेला. खालून वरपर्यंत कालव्याचा भराव निघाल्याने पाणी प्रचंड प्रमाणात बाहेर पडले.
-
पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने समुद्राला भरती यावी त्याप्रमाणे या पाण्याला लाटा येत असल्याचं दिसलं.
-
दरम्यान, या अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने वाहनचालकांनी मुख्य मार्गांचा आधार घेतला.
-
खडकवासला धरणातून पाणी सकाळी ७ वाजता बंद करण्यात आले आहे.
-
सध्या भराव टाकण्याचं काम सुरू असून लष्कर आणि पर्वती जलकेंद्रात पाणी घेतलं जातंय.
-
दरम्यान, यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
-
नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे.
-
तर, गाड्या पाण्यात गेल्याने गाड्यांचंही नुकसान होण्याची शक्यता आहे.
-
सर्व फोटो – Arul Horizon
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत