-
पुण्यात सोमवारी (३० मार्च) अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. (फोटो – Express photo)
-
वादळी वाऱ्यासह झालेल्या गारांच्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. (फोटो – Express photo)
-
अचानक आलेल्या तुफान पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली. (फोटो – Express photo)
-
शहरातील अनेक रस्त्यांवर गारांचा खच पाहायला मिळाला. जंगली महाराज रस्त्यावरील दृष्य. (फोटो – Express photo)
-
लष्कर पोलिस ठाणे आणि कॅम्प परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. (फोटो – Express photo)
-
मुसळधार पाऊस आणि गारांच्या वर्षावाचा फटका नागरिकांना बसला. (फोटो – Express photo)
-
अनेक ठिकाणी मार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. (फोटो – Express photo)
-
वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शहरात काही ठिकाणी झाडांची पडझड झाली. (फोटो – Express photo)
-
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. पाण्यातूनच नागरिक मार्ग काढताना दिसले. (फोटो – Express photo)
-
दुचाकी चालकांना अचानक आलेल्या पावसाचा चांगलाच फटका बसला. (फोटो – Express photo)
-
रस्त्यावर पाणी साचल्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंंडी निर्माण झाली होती. (फोटो – Express photo)
-
आंबेडकर रस्ता आणि ससून चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. (फोटो – Express photo)
-
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पीएमपीएमएलचे कर्मचारी आणि रिक्षा चालक रस्त्यावर उतरले. (फोटो – Express photo)
-
पुणे, मुंबईसह महाराष्ट्रात काही ठिकाणी पुढील दोन दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (फोटो – Express photo)
-
काही काळासाठी झालेल्या या पावसामुळे पुण्यात नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. (फोटो – Express photo)
-
अनेक भागात साचलेल्या पाण्यातून मार्ग काढण्यासाठी वाहन चालकांना कसरत करावी लागली. (फोटो – Express photo)
Photos: बारामतीच्या बागेत युगेंद्र पवार यांच्या पत्नीचं फोटोशूट; जांभळ्या साडीतील सौंदर्याने वेधले लक्ष