-
Heavy Rain In Pune Water Logging: पुणे शहर आणि परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे.
-
दुपारपासूनच मध्यवर्ती शहरासह उपनगरे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.
-
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वातावरणाच्या वरच्या स्तरात (५ ते १० किमी उंचीवर) पश्चिमेकडून दक्षिणेकडे थंड हवेचा प्रवाह वेगाने वाहत आहे.
-
हा प्रवाह नागमोडी स्वरूपाचा असल्याने अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे यात मिसळले जात आहेत.
-
यामुळेच शहरात पाऊस आणि गारपिटीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
-
३० मार्च रोजी बाणेरसह विविध भागात गारपीट झाली होती.
-
विशेष म्हणजे, शिवाजीनगर येथे नोंदवण्यात आलेला २६.६ मिमी पाऊस हा गेल्या दशकभरातील सर्वाधिक पाऊस ठरला आहे.
-
बुधवारी विश्रांती घेतल्यानंतर गुरुवारी दुपारी २ वाजल्यापासून वातावरणात पुन्हा वेगाने बदल झाले.
-
आकाश ढगांनी व्यापून आल्यानंतर शहराच्या मध्यवर्ती पेठांसह कात्रज, औंध, बाणेर, बिबवेवाडी, कोथरूड, शिवाजीनगर आणि उंड्री भागात पावसाचा जोर वाढला.
-
या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरून ओढ्यासारखे पाणी वाहत होते, तर सखल भागात पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
-
अचानक आलेल्या या पावसामुळे पुणेकरांची मोठी तारांबळ उडाली.
-
(सर्व फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)
“याला म्हणतात बहिणीचं प्रेम” भावाला बहिणीनं काय गिफ्ट दिलं पाहाच; VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी