-
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपती आज ५१ लाख सुवासिक आणि विविधरंगी फुलांनी सजवण्यात आले होते. (सर्व फोटो – Arul Horizon)
-
यासाठी मोगरी, लिली, झेंडू, गुलाब, जास्वंद, चाफा, शेवंती, गुलछडी, कमळ, जाई-जुई आदी फुलांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली होती.
-
वासंतिक उटी आणि मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने ही सजावट करण्यात आली होती.
-
गाभारा आणि सभामंडपातील रंगीबेरंगी पुष्पसजावटीमुळे मंदिर परिसरात एक वेगळंच चैतन्य पसरलं होतं.
-
बाप्पाच्या मूर्तीला शुंडाभूषणस मुकुट आणि विविध फुलांची आभुषणे घालण्यात आली होती.
-
चांदीच्या मूर्तीला वासंतिक उटीचे लेपनही करण्यात आले होते.
-
भक्तीमय वातावरणात फुलांचा सुगंध पसरल्याने दगडूशेठ गणपती मंदिरात अविस्मरणीय अध्यात्मिक सोहळाच साजरा झाला.
Video: ऑनस्क्रीन लेक ४१ व्या वर्षी होणार आई, नीना कुळकर्णींची डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला हजेरी, साधेपणाने वेधलं लक्ष