-
रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी स्थापन केलेल्या ‘वंतारा’ या जागतिक वन्यजीव संरक्षण संस्थेने जामनगरमध्ये ‘वंतारा विद्यापीठ‘ सुरू करण्याची घोषणा केली आहे.
-
वंतारा विद्यापीठाचा पाया प्राणी कल्याण, वैज्ञानिक प्रगती आणि वन्यजीव संरक्षणाचे भविष्य यावर आधारलेला आहे. पशुवैद्यकीय औषधोपचार, संरक्षण आणि वन्यजीव काळजी या क्षेत्रांत भविष्यातील नेतृत्व तयार करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. येथील अभ्यासक्रम भारताच्या समृद्ध ज्ञान परंपरेचा वापर करून भविष्याभिमुख शिक्षण पद्धती तयार करेल, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली.
-
वंतारा विद्यापीठ हे संकटात सापडलेल्या प्राण्यांना पाहून आणि त्यांच्या देखभालीसाठी अधिक सक्षम व्यवस्थेची गरज ओळखून घेतलेल्या एका वैयक्तिक प्रवासाचा परिणाम आहे, असं अनंत अंबानी म्हणाले.
-
वंतारा विद्यापीठ विविध विषयांना एकाच शैक्षणिक चौकटीत आणेल. वंताराच्या प्रत्यक्ष क्षेत्रीय अनुभवाचा उपयोग करून शैक्षणिक कार्यक्रम, व्यावसायिक प्रशिक्षण आणि जागतिक स्तरावर संबंधित आराखडे तयार केले जातील.
-
हे विद्यापीठ पदवी, पदव्युत्तर, फेलोशिप आणि विशेष अभ्यासक्रम उपलब्ध करून देईल. यामध्ये वन्यजीव औषधोपचार आणि शस्त्रक्रिया, पोषण, वर्तणूक विज्ञान, अनुवांशिकता, एपिडेमियोलॉजी, ‘वन हेल्थ’ आणि संवर्धन धोरण यांसारख्या विषयांचा समावेश असेल. तसेच, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देखील दिली जाईल.
-
प्रगत शैक्षणिक आणि क्लिनिकल पायाभूत सुविधा, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि निवासी संकुल ही या विद्यापीठाची वैशिष्ट्ये असतील.
-
वन्यजीव आरोग्य, प्राणी निवारा आराखडा आणि संवर्धन या क्षेत्रांत हे विद्यापीठ संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी एक दीर्घकालीन व्यासपीठ म्हणून काम करेल.
-
या प्रसंगी ‘वंतारा युनिव्हर्सिटी फाउंडिंग फेलोज’ आणि ‘एव्हरी लाईफ मॅटर्स’ शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली.
-
. केवळ शैक्षणिक व्यासपीठ न राहता, वन्यजीवांना केवळ कौतुकाचीच नव्हे, तर ज्ञान, व्यवस्था आणि प्रशिक्षित हातांची गरज आहे, हा दृष्टिकोन वंतारा विद्यापीठ प्रतिबिंबित करते.
-
वन्यजीव संरक्षण आणि पशुवैद्यकीय विज्ञानासाठी समर्पित असलेले हे जगातील पहिले एकात्मिक जागतिक विद्यापीठ आहे.
-
सर्व फोटो – वंतारा
-
-
-
Photos: “मला तुझी मुलगी असल्याचा खूप अभिमान…”; अमृता फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुलगी दिविजा फडणवीसची भावूक पोस्ट