-
प्रसिद्ध गायिका आणि उद्योजिका रिहानासाठी अंबानी कुटुंबाने मुंबईत एका खास स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. (फोटो – ANI)
-
ईशा, श्लोका, राधिका आणि अनंत अंबानी यांनी रिहानाचे त्यांच्या निवासस्थानी स्वागत केले. (फोटो – ANI)
-
या भेटीदरम्यान रिहानाला भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी भारतीय नृत्य, पारंपारिक कला दर्शवणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. (फोटो – ANI)
-
रिहानाने अंबानींच्या घरातील मंदिरात जाऊन प्रार्थना देखील केली, ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. (फोटो – ANI)
-
या भेटीचे मुख्य कारण ‘फेन्टी ब्युटी’ या रिहानाच्या ब्रँडचे रिलायन्स रिटेलच्या ‘तिरा’ प्लॅटफॉर्मवर झालेले अधिकृत लाँच हे होते. (फोटो – ANI)
-
रिहानाने या कार्यक्रमासाठी मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेले हिरेजडित ‘हाथफूल’ परिधान करून आपल्या लूकला भारतीय टच दिला होता. (फोटो – ANI)
-
रिहानाने मुख्य कार्यक्रमासाठी ‘मुगलर’ कलेक्शनमधील निऑन रंगाचा ड्रेस आणि नंतरच्या पार्टीसाठी काळ्या रंगाचा स्टायलिश जर्सी ड्रेस परिधान केला होता. (फोटो – ANI)
-
रिहानाचा हा दौरा भारताच्या विस्तारणाऱ्या लक्झरी रिटेल मार्केटसाठी आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या आगमनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. (फोटो – ANI)
-
रिहाना यापूर्वी २०२४ मध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नापूर्व सोहळ्यासाठी जामनगरला आली होती. (फोटो – ANI)
“भूषण गवईंना हे सांगणारे श्याम मानव कोण?” देवेंद्र फडणवीसांचा सवाल; धीरेंद्र शास्त्री भेटीवरून वाद