-
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची लेक रेवती सुळे हिच्याबरोबर विविध लोकांबरोबरच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. काल (२७ एप्रिल) त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. (सर्व फोटो – सुप्रिया सुळे/Instagram)
-
यावेळी राज्यसभेचे खासदार पार्थ पवारही उपस्थित होते.
-
काल, त्यांनी जयंत पाटील यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली.
-
या भेटींचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
रेवती सुळे यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे, त्यानिमित्ताने या भेटीगाठींना वेग आल्याचं म्हटलं जातंय. त्यांनी श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार यांचीही भेट घेतली.
-
काही दिवसांपूर्वी रेवती सुळे आणि सुप्रिया सुळे यांनी बारामतीची ग्रामदेवता माळावरच्या देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले होते.
-
तसंच, अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांचीही भेट घेऊन रेवती सुळे यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले.
-
विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते.
-
तसंच, बंधू राजेंद्र पवार यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. यावेळी सुनंदा पवार, आमदार रोहित पवार आणि कुंती पवार यांच्याशीही त्यांची भेट झाली. त्यांच्या या कौटुंबिक भेटीगाठींचे फोटो सध्या खूप चर्चेत आहेत.
४० दिवसांनंतर छप्परफाड पैसा! गुरू उदयामुळे ‘या’ ४ राशींवर होणार पैशांचा वर्षाव, सुरू होतील अच्छे दिन…