-
नवी दिल्लीतील मालवीय नगर येथे बुधवारी एका मोठ्या हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत २१ लोकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर ‘फ्लरिश बी अँड बी’ या निवासस्थानाच्या दुरवस्थेबद्दल अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. प्रत्यक्षदर्शी आणि वाचलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीमध्ये वेंटिलेशन (हवेची ये-जा) नसण्यासारख्या मोठ्या चुका आणि निष्काळजीपणा समोर आला आहे. (AP Photo)
-
या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये इमारतीतील लोक जीव वाचवण्यासाठी वरून खाली उड्या मारत असून, खाली उभे असलेले स्थानिक नागरिक त्यांच्यासाठी गाद्या पसरवत असल्याचे दिसत आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवासस्थानाचा वापर बहुतांश वेळा जवळच असलेल्या ‘मॅक्स हॉस्पिटल’मध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून केला जात होता. (PTI Photo)
-
‘व्हेंटिलेशन नव्हते, संपूर्ण इमारतीत धूर कोंडला’
घटनेच्या वेळी तिथे उपस्थित असलेले ४० वर्षीय गिरिराज प्रजापती यांनी सांगितले की, या इमारतीत वेंटिलेशनची कोणतीही सोय नव्हती. आसपासच्या बहुतेक इमारतींचीही अशीच अवस्था असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. प्रजापती म्हणाले, “संपूर्ण इमारतीत धूर कोंडल्यामुळे लोक वरच्या मजल्यावरून गाद्यांवर उड्या मारत होते.” स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत आत अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी खाली गाद्या पसरवल्या होत्या. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, आग पहिल्यांदा तळमजल्यावर लागली आणि ती वेगाने वरच्या मजल्यांवर पसरली. (PTI Photo) -
हॉटेलमध्ये खिडक्याही नव्हत्या
आपल्या आईच्या शस्त्रक्रियेसाठी या इमारतीत मुक्कामास असलेले बांगलादेशचे २६ वर्षीय तरुण मिन्हाजुल हसन यांनीही इमारतीत वेंटिलेशन नसल्याचा आरोप केला. या आगीतून आपण कसे थोडक्यात वाचलो हे सांगताना हसन म्हणाले की, त्यांचे भाऊ आग लागण्याच्या दहा मिनिटांपूर्वीच इमारतीतून बाहेर पडले होते, तर ते स्वतः त्यांच्या आईसोबत रुग्णालयात होते.” (PTI Photo) -
मात्र, आमचे सर्व पासपोर्ट आणि सामान आतच अडकले आहे. ते जळून खाक झाले असावे अशी आम्हाला भीती वाटत आहे. या इमारतीमध्ये अजिबात वेंटिलेशन नव्हते. तिथे खिडक्या नव्हत्या, अगदी बाथरूममध्येही खिडकी नव्हती,” असे हसन यांनी सांगितले. (ANI Photo)
-
३९ वर्षीय वकील मोहम्मद अफजल यांनी सांगितले की, इमारतीला येण्या-जाण्यासाठी एकच रस्ता (प्रवेशद्वार) होता, ज्यामुळे लोक आत अडकून पडले. याशिवाय, छताचे कुलूपही बंद होते. लोकांना बाहेर उड्या मारता याव्यात यासाठी आम्हाला खिडक्यांवर विटा फेकून त्या फोडाव्या लागल्या. (PTI Photo)
-
‘इमारत एखाद्या शाफ्टसारखी, सर्व बाजूंनी बंद’
मालवीय नगरमधील घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या उशिरा पोहोचल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. तथापि, दिल्ली अग्निशामक दलाचे (DFS) दक्षिण विभागाचे मुख्य अग्निशामक अधिकारी ए.के. मलिक यांनी सांगितले की, सकाळी ८.५० वाजता फोन आल्यानंतर लगेचच सात अग्निशामक गाड्या रवाना करण्यात आल्या होत्या आणि माहिती मिळताच गाड्यांची संख्या वाढवण्यात आली. (PTI Photo) -
“एकूण ३७ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सकाळी १०.२५ च्या सुमारास आग आटोक्यात आली. आम्ही अंतिम तपासणी पूर्ण करून इमारत सील केली आहे,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले. स्थानिकांनी केलेल्या दाव्याप्रमाणेच अग्निशामक अधिकाऱ्यानेही सांगितले की, ही इमारत चारही बाजूंनी बंद होती आणि ती एखाद्या “शाफ्ट” (बंद उभी जागा) सारखी होती.” ही इमारत चारही बाजूंनी बंद आहे. अशा इमारतींमध्ये आग वेगाने पसरते,” असे मुख्य अग्निशामक अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले.(PTI Photo)
-
परवानगी सहा खोल्यांची, वापर २५ खोल्यांचा
ज्या ‘फ्लरिश बी अँड बी’ मध्ये आग लागली, त्यांना केवळ सहा खोल्या चालवण्याची परवानगी होती. मात्र, तिथे क्षमतेपेक्षा चार पट अधिक खोल्या वापरल्या जात होत्या, अशी माहिती दिल्ली महानगरपालिकेच्या (MCD) एका सूत्राने दिली. या निवासस्थानाच्या ऑनलाइन बुकिंग पोर्टलवरही २५ खोल्या उपलब्ध असल्याचे दाखवले जात आहे. (AP Photo) -
ही मालमत्ता दिल्लीच्या ‘बी अँड बी’ (B&B) धोरणाच्या ‘सिल्व्हर’ श्रेणीअंतर्गत नोंदणीकृत होती आणि तिचा परवाना एप्रिल २०२७ पर्यंत वैध होता.दरम्यान, वेंटिलेशन आणि पुरेशा खिडक्या नसलेल्या या इमारतीमधून लोक जीव वाचवण्यासाठी बाहेर उड्या मारत असल्याचा एक अत्यंत वेदनादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (AP Photo)
-
धक्कादायक म्हणजे या हॉटेलमध्ये सर्वाधिक परदेशी नागरिक वैद्यकीय उपचारांसाठी भारतात आलेले होते. (PTI Photo)
“अनेक जोडप्यांसाठी आदर्श आहेत….”, भाग्यश्रीने केलं रितेश-जिनिलीयाचं कौतुक; ‘राजा शिवाजी’च्या सेटवरचे किस्से सांगत म्हणाली…