-
शहराच्या अनेक भागांत रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे (३०० मिमी पेक्षा जास्त) बुधवारी सकाळी मुंबईची तुंबई झाली. ठिकठिकाणी रस्ते जलमय झाले असून, वाहतुकीची प्रचंड कोंडी आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. (सर्व फोटो: PTI)
-
दक्षिण मुंबईत गेल्या २४ तासांत २४८ मिमी पावसाची नोंद झाली असून, गेल्या दशकातील जून महिन्यातील हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे.
-
भारतीय हवामान विभागाने (IMD) मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा अंदाज वर्तवत बुधवारी पहाटे ४ वाजता मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी ‘रेड नाऊकास्ट वॉर्निंग’ जारी केली होती.
-
हवामान खात्याने सकाळी ७ वाजता जिल्ह्याचा इशारा कमी करत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला. तसेच, मुंबईसाठी गुरुवार सकाळपर्यंत ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
-
मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे, हिंदमाता जंक्शन, दादर, गांधी मार्केट आणि मालाड सबवे या सखल भागांत पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
-
किंग सर्कल जंक्शनवरही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे.
-
ठिकठिकाणी पाणी साचल्याने आणि झाडे उन्मळून पडल्यामुळे, ‘बेस्ट’ (BEST) प्रशासनाकडून अनेक मार्गांवरील बस सेवा इतर मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत.
-
वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी आणि साचलेला पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरभरात पाण्याचा उपसा करणारे पंप तैनात केले आहेत.
-
ट्रान्स-हार्बर मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा जवळपास तासभर विस्कळीत झाली होती. यामुळे ठाणे आणि नवी मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे व दैनंदिन प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
‘सुरुवातीच्या काळात अशा प्रकारच्या गाजावाजाची गरजच…’, तुकाराम मुंढेंबद्दल BMC आयुक्त अश्विनी भिडे काय म्हणाल्या?