-
रायगडचा विहंगम नजारा दाखवणारे अतिशय सुंदर फोटो, उद्धव ठाकरेंनी इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. (फोटो – Instagram/ Uddhav Thackeray)
-
या पोस्टसाठी नितीन बानुगडे-पाटील यांनी कॅप्शन लिहले आहे. (फोटो – Instagram/ Uddhav Thackeray)
-
रायगड हा गरुडाच्या बसकणीसारखा, अत्यंत बेलाग, अभेद्य आणि ‘पूर्वेचा जिब्राल्टर’ म्हणून ओळखला जातो, बानुगडे – पाटील लिहतात. (फोटो – Instagram/ Uddhav Thackeray)
-
शिवरायांनी रायगडाची निवड स्वराज्याची राजधानी म्हणून केली आणि याच पवित्र भूमीवर ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. (फोटो – Instagram/ Uddhav Thackeray)
-
रायगड हा मराठी स्थापत्यकलेचे वैभव दर्शवणारा आणि स्वराज्याच्या राजकीय व आर्थिक सामर्थ्याचे सर्वोच्च प्रतीक आहे. (फोटो – Instagram/ Uddhav Thackeray)
-
किल्ल्यावरील भव्य महादरवाजा, नगारखाना आणि राजसभा ही शिवरायांच्या लोककल्याणकारी राज्याची साक्ष देतात. (फोटो – Instagram/ Uddhav Thackeray)
-
टकमक टोक, हिरकणी कडा आणि गंगासागर तलाव यांसारखी ठिकाणे आजही पराक्रम आणि इतिहासाची गाथा सांगतात. (फोटो – Instagram/ Uddhav Thackeray)
-
रायगडावर स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची पावन समाधी असून, हे ठिकाण अवघ्या मराठीजनांचे पवित्र प्रेरणापीठ आहे, असे ठाकरेंच्या फोटोंसाठी कॅप्शन पाटील यांनी लिहले आहे. (फोटो – Instagram/ Uddhav Thackeray)
‘कंपनीला कुटुंब मानण्याची चूक करू नका’, दोन वर्षांच्या मुलासह लॅपटॉप द्यायला गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा