-
राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. या घडामोडींवर आज राज ठाकरेंनी भाष्य करत परखड मत व्यक्त मांडलं. राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत बोलताना भाजपावर टीका करत मोठा इशारा दिला. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
एसआयआरबाबत काय म्हणाले? : “महाराष्ट्रात तीन वर्षांनंतर निवडणुका आहेत. पण आता एसआयआरची प्रतिक्रिया सुरू आहे. एसआयआरचा सर्वात मोठा फटका पश्चिम बंगाल, बिहारला बसला. बंगालमध्ये २७ लाख मते काढली गेली आणि ममता बॅनर्जींसारख्या नेत्यालाही पराभवाला सामोरं जावं लागलं.” (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
भाजपाला इशारा : “सध्या देशात जे राजकारण सुरू आहे, ते चांगलं नाही. खूप घाणेरडं आणि गलिच्छ राजकारण सुरू आहे. याचा फटका भविष्यात भारतीय जनता पक्षालाही बसणार आहे”, अशा इशारा राज ठाकरेंनी दिला.(फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
‘पुढच्या पिढ्यांची चिंता’ : “सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेलं नसतं. आपल्या एखाद्या कृतीचा भविष्यात चुकीचा पायंडा पडू नये, याचं भान नेत्यांना नसेल तर पुढच्या पिढ्यांची मला जास्त चिंता वाटते”, अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
‘भविष्यात भाजपाला त्रास होईल’ : “सत्ता येते आणि जाते. उद्या सत्ता गेल्यानंतर भाजपालाही अशाच प्रकारचा त्रास होईल. तेव्हा भाजपा काय करेल?”, असा सवाल राज ठाकरेंनी केला.(फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
“सत्ताधाऱ्यांनी जेव्हा-जेव्हा विरोधक संपवले, तेव्हा-तेव्हा सत्ताधारी पक्षात विरोधक तयार झाले आणि त्यांनीच त्यांना संपवलं. हीच प्रक्रिया आता भाजपात सुरू झालीय”, असा दावा राज ठाकरेंनी केला. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
‘मोदींमुळे भाजपा टीकून’ : फोडाफोडीच्या राजकारणावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही, तर प्रश्न विकले जाणाऱ्यांचा आहे. या गोष्टींचा लोकांमध्ये संताप आहे. सध्या जे काही भाजपा टीकून आहे ते फक्त नरेंद्र मोदींमुळेच आहे.” (फोटो-ग्राफिक्स टीम)
-
‘भाजपाच्या अंगाशी येणार’ : ‘सध्याचं फोडाफोडीचं राजकारण हे भाजपाच्याही एक दिवस अंगाशी येणार आहे. हे सगळं कशासाठी, कोणासाठी केलं जातंय? तर हे सगळं अमित शाह करत आहेत’, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
खासदारांच्या फुटीबाबत ठाकरे काय म्हणाले? : “शिवसेना ठाकरे पक्षाचे ६ खासदार फुटले. पण ते भाजपात का गेले नाही? टीएमसीच्या खासदारांचा वेगळा गट का केला? यामागे काय राजकारण आहे?”, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
“आपण पत्त्याचा बंगला करायचो ना, तसं येथे उलट आहे. सर्वात खालचा पत्ता मोदींचा आहे. एकदा मोदींचा पत्ता सरकला की बंगला कोसळणार, सध्या जे काही टिकून आहे ते मोदींवर आहे”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. (फोटो-संग्रहित छायाचित्र)