-
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३४१ व्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आज पहाटेपासून अत्यंत भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली.
-
या सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देहूनगरीत हजेरी लावत संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले.
-
पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त पहाटे पाच वाजल्यापासूनच देहूत विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली होती.
-
शिळा मंदिर आणि तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात संस्थानच्या विश्वस्तांच्या वतीने शासकीय महापूजा करण्यात आली.
-
त्यानंतर दुपारच्या सत्रात झालेल्या मुख्य प्रस्थान सोहळ्यात सुनेत्रा पवार सहभागी झाल्या.
-
त्यांनी विठ्ठल-रखुमाई आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची मनोभावे पूजा-आरती करून दर्शन घेतले.
-
“वारकरी संप्रदायाची अखंड भक्ती, समर्पण आणि सेवाभाव हा आपल्या सर्वांसाठीच नेहमी प्रेरणादायी राहिला आहे.
-
श्री विठ्ठलाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी लाभो; तसेच यंदा राज्यात उत्तम पाऊस होऊन बळीराजाच्या शेतात भरघोस पीक नांदो, हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना,” अशा भावना सुनेत्रा पवार यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या.
-
तुकाराम महाराजांच्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण देहूनगरी भक्तीचैतन्यात न्हावून निघाली होती.
-
लाखो वैष्णवांचा मेळा या अभूतपूर्व सोहळ्याचा साक्षीदार झाला. प्रस्थान झाल्यानंतर पालखीचा पहिला मुक्काम देहूतीलच ऐतिहासिक इनामदार वाड्यात असणार आहे.
अण्णा हजारेंबाबत प्रश्न विचारताच अभिजित दीपकेचं उत्तर; “म्हाताऱ्या माणसांनी निवृत्त होऊन आश्रमात बसावं”