-
मंगळवार, ७ जुलै रोजी देहूनगरीतील भक्तिमय वातावरणात पालखी प्रस्थान सोहळ्याने या वर्षीच्या आषाढी वारीस प्रारंभ झाला.
-
वारकरी संप्रदायाच्या अखंड श्रद्धेचे प्रतीक असलेल्या जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान पूजनाचा बहुमान यंदा छत्रपती संभाजीराजे यांना लाभला.
-
या मंगल समयी छत्रपती संभाजीराजे यांनी पालखीस स्वराज्याचा परंपरागत ‘भगवा ध्वज’ अर्पण केला.
-
या सोहळ्यासाठी व पालखी पूजनासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांच्या वतीने त्यांना सपत्नीक आमंत्रित करण्यात आले होते.
-
संयोगिताराजे छत्रपती व युवराज शहाजी छत्रपती यांच्यासमवेत या सोहळ्यास उपस्थित राहता आले, हा आमच्यासाठी अत्यंत गौरवपूर्ण क्षण होता.
-
हा अभूतपूर्व सन्मान दिल्याबद्दल श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार!
-
प्रस्थान सोहळ्यामुळे संपूर्ण देहूनगरी भक्ती आणि चैतन्याच्या रंगात न्हाऊन निघाली होती.
-
संत तुकाराम महाराजांची पालखी आज (बुधवारी) आकुर्डी येथे मुक्कामी असणार आहे.
-
दरम्यान, पुणे जिल्ह्यासह मावळ, देहू व आळंदी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : छत्रपती संभाजीराजे/इन्स्टाग्राम)
तुकाराम मुंढेंचं वक्तव्य; “माझी बदली झाली की मुलगा दोन प्रश्न विचारतो”