-
८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले.
-
ध्वजारोहण सोहळ्यासाठी त्यांनी पांढऱ्या शुभ्र कुर्ता-पायजमा आणि तपकिरी रंगाच्या जॅकेटचा पेहराव केला होता.
-
त्यांच्या या पेहरावावर त्यांनी परिधान केलेले गडद लाल रंगाचे बांधणी साफा म्हणजेच फेटा हे मुख्य आकर्षण ठरले.
-
या लाल रंगाच्या फेट्यावर पांढऱ्या आणि पिवळ्या रंगांचे बारीक नक्षीदार ठिपके असून त्याला खांद्यावर सोडलेला लांब पदर होता.
-
तपकिरी रंगाच्या जॅकेटच्या खिशात त्यांनी तिरंगी रुमाल लावून आपल्या पेहरावाला देशभक्तीचा स्पर्श दिला.
-
गुजरात आणि राजस्थानमध्ये प्रसिद्ध असलेली पारंपरिक बांधणी कला या फेट्याच्या माध्यमातून भारतीय वस्त्रोद्योगाची ओळख दाखवून देते.
-
पंतप्रधानांचा हा पेहराव ‘व्होकल फॉर लोकल’ म्हणजेच स्थानिक कला आणि कारागिरांना प्रोत्साहन देण्याच्या संदेशाचा पुनरुच्चार करतो.
-
सन २०१४ मधील पहिल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात त्यांनी परिधान केलेल्या पहिल्या लाल बांधणी फेट्याची आठवण या पेहरावाने पुन्हा ताजी केली.
-
या वर्षीचा पेहराव भारताच्या समृद्ध हातमाग परंपरेचा सन्मान करत देशाच्या सांस्कृतिक वारशाचा जागतिक स्तरावर गौरव करतो.
लालचुटूक डाळिंब आरोग्यासाठी ठरते वरदान; जाणून घ्या फायदे