कोणी म्हणतं ब्लॅक ब्यूटी तर कोणी बगीरा… खरोखरच या फोटोंवरुन तुमची नजर हटणारच नाही
- 1 / 15
कर्नाटकच्या जंगलांमधील ब्लॅक पँथरचे काही थक्क करणारे फोटो समोर आले आहेत. इंटरनेटवर हे फोटो व्हायरल झाले असून नेटकरी या फोटोंच्या प्रेमात पडले आहेत. वाइल्ड लाइफ फोटोग्राफर असणाऱ्या शहाझ जंग यांनी काढलेले हे फोटो काबीनी जंगलांमधील आहेत. अर्थ नावाच्या ट्विटवरील अकाउंटवरुन हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. मात्र शहाझ जंग यांनी या ब्लॅक पँथरचे अशाप्रकारे काही भन्नाट फोटो आपल्या इन्स्ट्राग्राम अकाउंटवर म्हणजेच @shaazjung (instagram/shaazjung) या अकाउंटवरुन शेअऱ केले आहेत. त्यांच्या याच इन्स्ताग्राम अकाउंटवरील हे काही खास फोटो. (सर्व फोटो साभार: @shaazjung यांच्या अकाउंटवरुन)
- 2 / 15
झाडाच्या मागून डोकावून पाहणारा हा फोटोही मागील काही दिवसांपासून व्हायरल झाला आहे. (फोटो: @shaazjung)
- 3 / 15
वाइल्ड लाइफ फोटोग्राफर असणारे शहाझ जंग हे निकॉन, नॅशनल जिओग्राफीसारख्या कंपन्यांसोबतही काम करतात. (फोटो: @shaazjung)
- 4 / 15
शहाज यांनी शेअर केलेला हा आणखीन एक सुंदर फोटो. (फोटो: @shaazjung)
- 5 / 15
या फोटोमध्ये तर ब्लॅक पँथर शोधण्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील. (फोटो: @shaazjung)
- 6 / 15
याला म्हणतात किलर लूक (फोटो: @shaazjung)
- 7 / 15
हा फोटो शहाज यांनी सूर्यास्ताच्या वेळी टीपला आहे. (फोटो: @shaazjung)
- 8 / 15
शहाज यांच्या इन्स्टा बायोप्रमाणे ते बिग कॅट म्हणजेच मांजर प्रजातीच्या प्राण्यांचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी काढलेल्या या भन्नाट फोटोवरुन त्याचा अंदाज येतोच. (फोटो: @shaazjung)
- 9 / 15
शहाज यांनी काढलेले फोटो पाहून अनेकांना जंगलबूकमधील बगीराचा आठवण होते. (फोटो: @shaazjung)
- 10 / 15
जंगल बुकमधील कथेनुसार बगीरा नावाचा ब्लॅक पँथर मोगलीला जंगलामध्ये घेऊन येतो आणि त्याला जंगलातील राहणीमान शिकवतो. "केवळ भारतामध्येच बगीरा अशाप्रकारे प्रत्यक्षात दिसू शकतो अगदी जंगल बूकप्रमाणे. केवळ भन्नाट," असं एकाने शहाज यांनी काढलेल्या व्हायरल झालेल्या फोटोवर कमेंट करताना म्हटलं आहे. (फोटो: @shaazjung)
- 11 / 15
शहाज मागील अनेक वर्षांपासून जंगली प्राण्यांचे फोटो काढण्याचं काम करतात. ते प्रोफेश्नल वाइल्ड लाइफ फोटोग्राफर आहेत. (फोटो: @shaazjung)
- 12 / 15
शहाज यांनी टीपलेला हा आरामाच्या मूडमध्ये असणारा ब्लॅक पँथर (फोटो: @shaazjung)
- 13 / 15
शहाज यांच्या इन्टाग्राम अकाउंटवर बँक पँथरबरोबरच इतरही अनेक प्राण्यांचे सुंदर फोटो पहायला मिळतात. (फोटो: @shaazjung)
- 14 / 15
पँथर आळस देत असतानाचा क्षण शहाज यांनी अचूक टीपला आहे. (फोटो: @shaazjung)
- 15 / 15
हे फोटो इतके सुंदर आहेत की अभिनेत्री करिना कपूरलाही ते इन्टाग्रामवरुन शेअर करण्याचा मोह आवरला नाही.