“उठा… चीनवरुन आलेल्या नव्या रोगाची बातमी वाचा… झोपा”; Bubonic Plague च्या बातमीवर प्रतिक्रियांचा पाऊस
- 1 / 15
जगभरामध्ये करोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच चीनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर चीनमधील एका शहरामध्ये रविवारी (५ जुलै २०२० रोजी) ब्यूबॉनिक प्लेगचे दोन नवीन संक्षयित रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर शहरामधील आरोग्य यंत्रणेने हाय अलर्ट जारी केला आहे. चिनी प्रसारमाध्यमांनी सध्या तरी या आजाराचे दोन रुग्ण आढळून आल्याचं म्हटलं आहे. मात्र प्राण्यांमधून मानवामध्ये या आजाराचा सहज संसर्ग होऊ शकतो. त्यामुळेच भविष्यात अशी आणखीन काही रुग्ण आढळण्याची शक्यता असल्यानेच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चीनमधून आलेल्या या बातमीवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. मात्र हा संताप व्यक्त करण्यासाठी मिम्सची मदत अनेकांनी घेतली आहे. पाहुयात असेच काही व्हायरल मिम्स... (File Photo | AP)
- 2 / 15
ब्यूबॉनिक प्लेगची बातमी वाचवल्यार पहिली प्रतिक्रिया
- 3 / 15
चिनी लोकं म्हणत असतील याला म्हणतात संस्कार...
- 4 / 15
बाकी देशांची धडधड वाढली...
- 5 / 15
मारुन टाका एकदाचे आणि व्हा मोकळे...
- 6 / 15
चीन म्हणतयं आपण तर एण्डगेममध्ये आहोत
- 7 / 15
रोज उठा... चीनमधून आलेल्या विषाणूची बातमी वाचा.. झोपा...
- 8 / 15
एक साथ झाली की दुसरी साथ संपण्याचा वाट बघता बघताच वय निघून जाणार...
- 9 / 15
हे असं काहीतरी झालयं असं म्हणणं आहे एका युझरचं...
- 10 / 15
चिनी लोकांना कोणीतरी पराठा बनवायला शिकवा रे...
- 11 / 15
या बाळाचा फोटो आधीही व्हायलर झाला होता आणि आताही...
- 12 / 15
करोनाचे महत्व कमी होणार...
- 13 / 15
चलो मंगळ...
- 14 / 15
महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रांनीही ब्यूबॉनिक प्लेगच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे
- 15 / 15
काय आहे ब्यूबॉनिक प्लेग ब्यूबॉनिक प्लेगला ग्लिटीवाला प्लेग असही म्हणतात. या आजारामध्ये शरीराला असह्य वेदना होतात, खूप ताप येतो तसेच नाडीचे ठोके वाढतात. त्यानंतर शरीरावर फोड येतात आणि दोन आठवड्यांमध्ये ते पिकतात. शरीरावर फोड आल्यानंतर त्वाचेची प्रचंड जळजळ होते. प्लेग हा उंदारांमार्फत पसरणारा रोग आहे. उंदीर मेल्यानंतर त्याच्या शरीरावरील पिसवांच्या माध्यमातून प्लेगच्या विषाणूंचा संसर्ग मानवाला होतो. उंदारच्या शरीरावरील पिसवे मानवाचा चावल्याने प्लेगचा संसर्ग होतो. उंदीर मेल्यानंतर जवळजवळ दोन ते तीन आठवड्यांच्या कालावधीमध्ये प्लेगचा संसर्ग मानवाला होतो. (फोटो: विकीपीडीयावरुन साभार)