क’मॉल’ झाली… ‘या’ देशात उभा राहतोय ११ फुटबॉल ग्राउंड मावतील एवढा मॉल
- 1 / 6
आपल्या लाइफस्टाइलसाठी आणि पर्यटाकांना आकर्षित करणाऱ्या मोठ्या मोठ्या आकारांच्या मॉलसाठी ओळखल्या जाणाऱ्या दुबईमध्ये आणखीन एक भला मोठा मॉल बांधला जात आहे. सिलिकॉन सेंट्रल (Silicon Central, Dubai) नावाचा हा मॉल तीन मजल्यांचा असणार आहे. मात्र याचे वैशिष्ट्य म्हणजे या मॉलचा आकार ११ फुटबॉल मैदानांच्या आकाराहूनही मोठा असणार आहे, असं गल्फ न्यूजने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. चला तर पाहुयात काय काय असणार आहे या मॉलमध्ये... (फोटो सौजन्य : siliconcentral.ae)
- 2 / 6
सिलिकॉन सेंट्रल मॉलमध्ये २२० दुकाने असणार आहेत. मॉलचा एकूण एरिया ८१,५०० स्वेअर मीटर (८.१ हेक्टर) इतका असणार आहे. यात नऊ हजार स्वेअर मीटरचे हापर मार्केट आणि ७ हजार ८०० स्वेअर मीटरचे डिपार्टमेंटल स्टोअरही असणार आहे. तर मॉलमधील ३५ हजार ५०० स्वेअर मीटर जागा ही रिटेल शॉप्ससाठी आणि सेवांसाठी आरक्षित ठेवली जाणार आहे. (फोटो सौजन्य : siliconcentral.ae)
- 3 / 6
शॉपिंगबरोबरच या मॉलमध्ये अनेक हॉटेल्सही सुरु केली जाणार आहेत. यामध्ये २४ कॅज्युअल रेस्तराँ आणि फूड कोर्टमध्ये २१ युनिट्सचा समावेश असणार आहे. (फोटो सौजन्य : siliconcentral.ae)
- 4 / 6
'सिलिकॉन सेंट्रल'मध्ये सहा हजार ८०० स्वेअर मीटरचे फॉमेली एन्टर्टेन्मेंट सेंटर असणार आहे. यापैकी दोन हजार स्वेअर मीटरमध्ये न्यू जनरेशन एन्टर्टेन्मेंट सेंट्रल उभारण्यात येणार असून त्यात मुलांबरोबर मोठ्या व्यक्तींसाठी वेगवेगळे गेम्स असणार आहेत. या फॉमेली एन्टर्टेन्मेंट सेंटरमध्ये १२ स्क्रीन्स असणारे मोठे मल्टीप्लेक्सही उभारण्यात येणार आहे. येथे अडीच हजार स्वेअर मीटर एरियात जीमही उभारलं जाणार आहे. (प्रातिनिधिक फोटो)
- 5 / 6
मॉलला साडेतीन हजार गाड्या पार्क करता येईल एवढं मोठं पार्कींग असणार आहे. (फोटो सौजन्य : siliconcentral.ae )
- 6 / 6
हा मॉल दुबईमधील दुबई सिलिकॉन ओऐसीस जवळ अल अइन रोडवर बांधण्यात येत आहे. (फोटो सौजन्य : Google maps)