बाई… बाटली अन् बंदूक… ‘King of Instagram’चा राजेशाही थाट; संपत्ती पाहून व्हाल थक्क
- 1 / 50
डॅन बिल्झेरियन हे नाव इन्स्टाग्रामवर असणाऱ्या अनेकांना ठाऊक असणार.
- 2 / 50
आज डॅन बिल्झेरियनचा वाढदिवस आहे. डॅन आज ४० वर्षांचा झाला. त्याचनिमित्ताने जाणून घेऊयात त्याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी...
- 3 / 50
आपली श्रीमंती इन्स्टाग्रामवरील फोटोंमधून सतत दाखवणाऱ्या डॅनला ‘किंग ऑफ इन्स्टाग्राम’ म्हणून ओळखले जाते.
- 4 / 50
गाड्या, महागडी घरे, विमाने, शस्त्रे, महागडी हॉटेल अशा अनेक ठिकाणी काढलेले डॅनचे फोटो डॅन इन्स्टाग्रामवरुन पोस्ट करतो.
- 5 / 50
- 6 / 50
वादग्रस्त व्यक्तीमत्व असलं तरी डॅनचे जगभरात चाहते आहेत.
- 7 / 50
अमेरिकेतील फ्लोरिडामधील थांम्पा येथे डॅनचा जन्म झाला.
- 8 / 50
डॅन फोटोंमधून सतत आपल्या अती श्रीमंत लाइफस्टाइलचे दर्शन त्याच्या फॉलोअर्सला घडवत असतो.
- 9 / 50
उदाहरणच द्यायचे झाल्यास डॅन रिचर्ड मिले आरएम १-०३ हे घड्याळ घालतो.
- 10 / 50
आता तुम्ही म्हणाल यात विशेष काय. तर या घड्याळाबद्दलची विशेष गोष्ट आहे ती त्याची किंमत. डॅन वापरत असलेल्या घड्याळाची किंमत चक्क १ कोटी ३६ लाख इतकी आहे.
- 11 / 50
सोप्या भाषेत सांगायचे तर त्याच्या किंमतीमध्ये भारतातील कोणत्याही टू टायर शहरामध्ये दोन बंगले विकत घेता येतील इतकी या घड्याळाची किंमत आहे.
- 12 / 50
डॅनचे खास घड्याळ मॅकलरेनच्या गाडीच्या डिझाइनपासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आले आहे. या घड्याळाला टायटॅनियम पुशर्स आणि टायटॅनियम क्राऊन आहे. या घड्याळातील अनेक गोष्टी मॅकलरेन गाडीच्या डिझाइनशी साधर्म्य साधणाऱ्या आहेत.
- 13 / 50
डॅन हा प्रोफेश्नल पोकर खेळाडू असून त्याचा भाऊ अॅडम बिल्झेरियन हा सुद्धा एक नावाजलेला पोकर खेळाडू आहे.
- 14 / 50
डॅनचे वडील हे अमेरिकेतील वॉल स्ट्रीट कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर कामाला होते. डॅनकडील संपत्ती वडीलांनीच दिल्याचे सांगण्यात येतं.
- 15 / 50
२००० साली डॅनने अमेरिकन नौदलात सील कमांडो म्हणून भरती होण्यासाठी प्रवेश परिक्षा दिली मात्र त्यात त्याला यश आले नाही.
- 16 / 50
त्यानंतर डॅनने फ्लोरिडा विद्यापिठातून व्यापार आणि गुन्हा व गुन्हेगार याविषयींचे शास्त्र या विषयांचा अभ्यास केला.
- 17 / 50
डॅनने काही सिनेमांमध्येही कामही केलं आहे. अभिनेता अशीही तो स्वत:ची ओळख सांगतो.
- 18 / 50
ऑलंपस हॅज फॉलन (२०१३), द इक्वीलायझर (२०१४) हे त्यापैकी गाजलेले चित्रपट आहेत.
- 19 / 50
डॅन अनेकदा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटमुळे चर्चेत असतो.
- 20 / 50
अनेकदा डॅन मुलींसोबतचे फोटो पोस्ट करत असतो.
- 21 / 50
इन्स्टाग्रामवरील फोटोंमुळे डॅन अनेकदा टीकेचा धनी ठरतो किंवा वादात सापडतो.
- 22 / 50
इन्स्टाग्रामवरील फोटोंमुळे डॅन अनेकदा टीकेचा धनी ठरतो किंवा वादात सापडतो.
- 23 / 50
डॅनकडे स्वत:चे प्रायव्हेट विमानही आहे.
- 24 / 50
या प्रायव्हेट विमानामधून अनेकदा डॅन आपल्या मैत्रिणींसोबत वेगवेगळ्या ठिकाणी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जात असतो.
- 25 / 50
डॅन कधी जेट स्की चालवताने फोटो पोस्ट करतो.
- 26 / 50
तर कधी प्राण्यांबरोबरच किंवा समुद्रकिनाऱ्यावरील फोटो पोस्ट करतो.
- 27 / 50
डॅनला त्याची मांजर फार प्रिय आहे.
- 28 / 50
अगदी प्रत्येक ट्रीपला डॅन आपल्या मांजरीला सोबत घेऊन जातो. तिच्याबरोबरचे विमानातील फोटोही तो पोस्ट करत असतो.
- 29 / 50
डॅनला महागाड्या गाड्यांचीही खास आवड आहे.
- 30 / 50
डॅनकडे अनेक अलिशान गाड्या आहेत.
- 31 / 50
तसेच डॅनकडे त्याच्या बाईक्सचं विशेष कलेक्शन आहे.
- 32 / 50
डॅनला समुद्रकिनाऱ्यांवर सुट्ट्यांसाठी जाणं आवडतं. त्यामुळेच त्याच्याकडे समुद्रकिनारी भटकता येईल अशा अनेक मॉन्स्टर बाईक्स आहेत.
- 33 / 50
डॅनला हत्यारांचीही विशेष आवड आहे. डॅनचे बंदुकींचे स्वत:चे मोठे प्रायव्हेट कलेक्शन आहे.
- 34 / 50
अनेकदा डॅन मोकळ्या जागांवर जाऊन शुटींगचा सराव करत असतो.
- 35 / 50
डॅनला आपल्या पैशांचा शो ऑफ म्हणजेच दिखावा करायला आवडते.
- 36 / 50
डॅनच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याने अनेकदा घरातील पैशांचे फोटो पोस्ट केलेत.
- 37 / 50
डॅनबद्दल इन्स्टाग्रामवर संमिश्र प्रतिक्रिया येत असतात. अनेकदा महिलांचे अर्धनग्न फोटो पोस्ट करण्यावरुन त्याच्यावर टीका होताना दिसते.
- 38 / 50
डॅनला साहसी खेळ आणि प्राण्यांची विशेष आवड आहे.
- 39 / 50
बॉक्सिंग सुद्धा डॅनच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
- 40 / 50
डॅन अनेक वादांमध्येही अडकला आहे. त्यांची संपत्ती असो किंवा महिलांना दिली जाणारी वागणूक असो तो अनेकदा वादात सापडलाय.
- 41 / 50
एकदा डॅनने एका मॉडेलला क्लबमध्ये झालेल्या हणामारीमध्ये तोंडावर लाथ मारली होती. नंतर हे प्रकरण अगदी न्यायलयापर्यंत गेलं होतं.
- 42 / 50
डॅनचे वडील हे अर्मानियाचे आहेत तर आई अमेरिकन.
- 43 / 50
डॅनने अनेक गोष्टींबद्दल केलेल्या दाव्यांसंदर्भात शंका उपस्थित केली जाते. त्याच्याकडे एवढा पैसा कसा काय आहे यासंदर्भातही अनेकदा चर्चा झाल्याचे पहायला मिळालं आहे.
- 44 / 50
डॅनला मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात एका कार्यक्रमानिमित्त मुंबईमध्ये आला होता.
- 45 / 50
भारतामधील सर्वात मोठा पोकर शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोकर चॅम्पियनशीपसाठी तो भारतात आला होता.
- 46 / 50
मुंबईतील ताज लॅण्ड्समध्ये ड२न काही दिवस थांबला होता. नंतर तो गोव्याला रवाना झालेला.
- 47 / 50
डॅन हा अनेकदा वेगवेगळ्या पार्ट्यांचे आयोजन करतो.
- 48 / 50
मेरिकेतील वेगवेगळ्या शहरांमध्ये डॅनची चार मोठी घरं आहेत.
- 49 / 50
डॅनची एकूण संपत्ती १५ कोटी डॉलर इतकी आहे.
- 50 / 50
अनेकदा डॅन पर्यटनाला गेल्यावर तेथील काही खास फोटो पोस्ट करत असतो. (सर्व फोटो : danbilzerian/instagram वरुन साभार)