Lockdown In Maharashtra : काय सुरू, काय राहणार बंद?
- 1 / 10
(संग्रहित छायाचित्र)
- 2 / 10
राजेश टोपे यांनी नव्या नियमावलीबद्दल माध्यमांशी बोलताना माहिती दिली. टोपे म्हणाले,"रात्री पूर्णपणे संचारबंदी असणार आहे. तर दिवसाही जमावबंदी असणार आहे. फक्त अत्यावश्यक आणि वैद्यकीय सेवाच सुरू राहतील. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणं, मग गार्डन असेल वा यासारख्या गर्दी होणाऱ्या ठिकाणी जाण्यास रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत प्रवेश बंदी असेल. दिवसा जर गर्दी झाल्याचं प्रशासनाला दिसलं, तर प्रशासनं बंद करण्याचा निर्णय घेईल. पण, दिवसा गार्डन सुरू राहतील."
- 3 / 10
"तिसरी गोष्ट म्हणजे शॉप्स, मार्केटस्, मॉल्स या ठिकाणी अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. उर्वरित सगळं बंद राहिलं. सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे सुरू राहिल. पण थोडेफार निर्बंध राहतील. निर्बंध पाळले नाही, तर किमान ५०० रुपये दंड आकारला जाईल. सर्व खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉमच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यातून बॅकिंग, इन्शुरन्स यासारख्या सेवांना सुट दिलेली आहे," असं टोपे म्हणाले.
- 4 / 10
"सरकारी कार्यालयेही बंद राहणार आहेत. पण कोविडशी संबंधित कार्यालये आहेत, ते पूर्ण क्षमतेनं सुरू राहतील. मंत्रालयात येणाऱ्यांना आता लसीकरण झालेलं असेल तर प्रवेश दिला जाणार आहे. मंगल कार्यालयाच्या मालकांना १० हजारापर्यंत दंड आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. रस्त्याच्या बाजूला वस्तू विकणाऱ्यांना वस्तू घरपोच सेवा देता येईल," असंही टोपे म्हणाले.
- 5 / 10
याबरोबरच मॉल्स, बार, रेस्तराँ बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, ‘टेक अवे’ सर्व्हिस सुरु राहणार आहे. सरकारी कार्यालयात ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज केलं जाणार आहे.
- 6 / 10
राज्यातील सर्व उद्योग चालू राहणार, उद्योग क्षेत्रातील कामगारांवर कुठलेही निर्बंध असणार नाहीत. कामगारांची राहण्याची व्यवस्था असलेली सर्व बांधकामे सुरु राहतील. सरकारी ठेके असलेली कामेही या काळात सुरु राहणार आहेत.
- 7 / 10
भाजी मार्केटवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध असणार नाहीत, फक्त गर्दी कमी करण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात येणार आहेत. तर सर्व वाहतूक व्यवस्था सुरु राहणार, मात्र प्रवास करताना मास्क बंधनकारक असणार आहे.
- 8 / 10
सोमवार ते शुक्रवारपर्यंत राज्यात नियमावलीत दिलेल्या सेवा सुरू राहणार आहेत. तर शुक्रवारी रात्री ८ पासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाउन असणार आहे.
- 9 / 10
आठवड्याच्या शेवटी असणाऱ्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळं बंद राहतील. सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात येणार आहे.
- 10 / 10
राज्यात सलून, ब्युटीपार्लर बंद राहणार आहेत. जिमही बंद राहणार आहेत. रिक्षामध्ये चालकासह दोघांना प्रवास करता येणार आहे. बसमधून फक्त बसून जाता येईल इतक्याच लोकांना प्रवास करण्याची मूभा असणार आहे. तर लोकलमधूनही आसन क्षमतेइतक्याच प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. सिनेमागृह, नाट्यगृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर चित्रपटांच्या शुटिंगला परवानगी असणार आहे. पण गर्दी होणाऱ्या म्हणजेच लढाई वा आंदोलनासारख्या सीनच्या शुटिंगला बंदी असणार आहे.