
उत्तर भारतातील तीव्र थंडीची लाट आणि सातत्याने होणाऱ्या बर्फवृष्टीचा परिणाम मुंबईसह महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे.
व्हायरल मिम
मुंबईकरांना उन हवं आहे
सर्वत्र किमान तापमानात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सिनेमातील डायलॉगचे मिम्स
मुंबईत यंदा थंडीच्या हंगामातील सर्वात कमी तापमानची नोंद करण्यात आली आहे.
मुंबईकरांना मस्त चादर घेऊन थंडीचा आनंद घेयचा आहे
मुंबईत १३.२ अंश तापमान नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने मुंबईकर गुलाबी थंडीचा अनुभव घेताना दिसत आहेत.
मुंबईकरांना या थंडीचा अजिबातच सवय नाही
मुंबईकरांसाठी २५ डिग्रीच्या खाली पारा जाणं म्हणजे थंडी असण आहे.
स्कायमेट या हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रुझ परिसरात १३.२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
मुंबईकर आणि दिल्लीकरांमधील फरक
पुणेकर मुंबईकरांकडे बघताना
हे यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमान आहे. विशेष म्हणजे गेल्या २४ तासात मुंबईतील पारा हा ५ अंशांनी घसरला आहे, अशी माहिती समोर आली आहे.
मुंबई हे एखद्या हिल स्टेशनप्रमाणे वाटत आहे.
विशेष म्हणजे मुंबईतील कमाल तापमानातही घसरण झाली आहे.
सध्या मुंबईत २६.७ कमाल तापमान पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हे तापमानही सर्वात कमी आहे.
व्हायरल मिम
पुढील ३ ते ४ दिवस मुंबईत ही थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
जुन्या सिनेमाची नेटीझन्सला झाली आठवण
पुढील किमान आठवडाभर तरी मुंबई आणि उर्वरित राज्यात थंडीची तीव्रता कायम असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील तीव्र थंडीची लाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे उत्तर भारतातून मुंबईत थंड वारे वाहत आहे. हेच वारे वाढत्या थंडीला कारणीभूत आहेत.
तसेच त्या ठिकाणी सातत्याने बर्फवृष्टी होत आहे. या दोन कारणांमुळेच मुंबईसह महाराष्ट्रात थंडीचा जोर पाहायला मिळत आहे. अशी माहिती स्कायमेट या हवामान संस्थेचे शास्त्रज्ञ महेश पालवत यांनी ट्वीट करत दिली.
मुंबईच्या हवेत वाढलेला सुखद गारव्याचा नागरिक आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई अगदी एखाद्या बर्फाळप्रदेशासारखं वाटत आहे.
पारा कमी होताच मुंबईकर गारठले आहेत आणि थंडीची मज्जा घेत आहेत (सर्व फोटो: Twitter)