
मिर्झापूर वेब सिरीजमधील बीना त्रिपाठी तुम्हाला आठवतंच असेल.

त्या बीना त्रिपाठी म्हणजेच रसिका दुग्गलचा आज वाढदिवस.

तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिचा प्रवास.

रसिकाने अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. परंतु तिला खरी लोकप्रियता मिर्झापूर सिरीजनंतर मिळाली.

जमशेदपूर झारखंडमध्ये मोठी झालेली रसिका दुग्गल गणिताची पदवीधर आहे.

ती सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार आहे आणि तिने २००४ मध्ये दिल्लीतील लेडी श्री राम कॉलेज फॉर वुमनमधून गणित विषयात पदवी पूर्ण केली आहे.

त्याचबरोबर तिने मुंबईच्या सोफिया पॉलिटेक्निक कॉलेजमधून सोशल कम्युनिकेशन मीडियामध्ये पदव्युत्तर डिप्लोमा केला आहे.

तिची पहिली नोकरी एका प्रकल्पावर रिसर्च असिस्टंट म्हणून होती. त्यानंतर तिला अभिनयाची आवड निर्माण झाली.

गणिताची पदवीधर असलेल्या रसिकासाठी करिअर बदलणे ही मोठी गोष्ट होती. पण तिने पक्का निर्धार केला होता.

त्यानंतर तिने पुण्यातील एफटीआयआयमध्ये प्रवेश घेतला आणि तेथून अभिनयात पोस्टग्रेजुएट डिप्लोमा केला.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘हमीद’ या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी रसिकाला राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी तिला प्रथम संपर्क साधण्यात आला होता, परंतु तिने तिच्या जागी काश्मिरी अभिनेत्री आणण्याची विनंती चित्रपट निर्मात्याला केली.

तिने २००८ मध्ये आलेल्या ‘तहान’ चित्रपटातून नादिरा ही भूमिका साकारत अभिनयात पदार्पण केले.

या चित्रपटाला ११व्या ऑलिंपिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल फॉर चिल्ड्रनमध्ये युनिसेफ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तिचा इरफान खान आणि तिलोतमा शोम यांच्यासोबतचा ‘किस्सा’ हा इंडो-जर्मन चित्रपटही चांगलाच गाजला होता.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण रसिका दुग्गलने तिच्या करिअरमध्ये बॉलिवूड चित्रपटांसोबतच टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे.

२०१० मध्ये ती टीव्ही शो ‘पावडर’मध्ये दिसली होती. तिने २०१२ मध्ये ‘उपनिषद गंगा’ या पौराणिक मालिकेतही काम केले आहे. या कार्यक्रमात तिने विविध भूमिका साकारल्या होत्या.

रसिका दुग्गल गेल्या १५ वर्षांपासून बॉलिवूमध्ये काम करतीये.

पण तिला खरी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली ती मिर्झापूर या वेब सिरीजमुळे.

याशिवाय रसिकाने दिल्ली क्राईम सिरीजमध्ये नीती सिंगची भूमिका साकारली होती.

मेड इन हेव्हन या जोया अख्तरच्या सिरीजमध्ये रसिकाने नुतन यादवची भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली होती. (फोटो – फेसबुकवरून साभार)