
वयाच्या ९व्या वर्षात आपल्यापैकी अनेकांना कदाचित अरब म्हणजे नक्की किती हे देखील माहित नसेल. परंतु सर्वांचंच आयुष्य सारखं नसतं.

नायजेरियामधील एक ९ वर्षाचा मुलगा ऐशो-आरामाचं जीवन जगत आहे. त्याला जगातील सर्वात कमी वयाचा अरबपती म्हटलं जातंय.

मोहम्मद अवल मुस्तफा उर्फ मोम्फा ज्युनिअर अगदी कार्टूनमधल्या रिची रिचचं आयुष्य जगतोय.

त्याच्याकडे वयाच्या सहाव्या वर्षीच स्वतःचा पहिला बंगला (Mansion) होता.

द सनच्या रिपोर्टनुसार मोम्फा एका खाजगी जेटमधून जगभर फिरतो. त्याच्याकडे इतर अनेक बंगले आणि सुपर कार्स आहेत.

आपल्या महागड्या गाड्यांच्या संग्रहाचे प्रदर्शन करताना, मोम्फा ज्युनिअरच्या काही फोटोंच्या कॅप्शनमध्ये ‘हॅपी बर्थडे टू मी’ आणि ‘थँक्स डॅडी’ असे लिहले आहे.

त्याच्या सुपर कारच्या कलेक्शनमध्ये एक पिवळ्या रंगाची फरारी, बेंटले फ्लायिंग स्पार आणि रोल्स-रॉयस व्रेथ यांचा देखील समावेश आहे.

नायजेरियाच्या लागोसमध्ये राहणारा मोम्फा ज्युनिअर, अरबपती नायजेरियन इंटरनेट सेलिब्रिटी इस्माइलिया मुस्तफा, मोहम्मद अवल मुस्तफा यांचा मुलगा आहे.

मोम्फा ज्युनिअर याचे इंस्टाग्राम अकाउंटवर ३० हजारपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. इंस्टाग्रामवर तो आपल्या भव्य जीवनशैलीचे फोटो पोस्ट करतो.

त्याला वर्साचे आणि गुची यांच्यासारख्या स्टायलिश ब्रँडचे कपडे परिधान केलेले आपण पाहू शकतो. तसेच त्याच्या अनेक फोटोमध्ये सुपर कार्स देखील पाहायला मिळतील.

या फोटोमध्ये तो त्याच्या खाजगी जेटमध्ये जेवताना दिसत आहे.

हा युवा अरबपती आपल्या लहान बहिणीसोबत आपल्या वडिलांच्या इंस्टाग्रामवर ददरोज दिसतो.

द सनच्या रिपोर्टनुसार, मोम्फा सिनिअर यांनी मोम्फा ज्युनिअरच्या सहाव्या वाढदिवशी त्याला त्याचा पहिला बंगला भेट म्हणून दिला होता. (Photo : Instagram / @momphajnr)