
उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कालपासून वाराणसीमध्ये आहेत.

वाराणसी हा पंतप्रधान मोदींचा लोकसभा मतदारसंघ आहे. त्यामुळेच नेहमीप्रमाणे यंदाही मोदींचं मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात आलं.

वाराणसीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपा समर्थकांनी मोदींच्या रोड शोला उपस्थिती लावली होती.

यावेळी पंतप्रधान मोदींनी काशी विश्वनाथ मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं.

पंतप्रधान मोदींनी आज सकाळपासूनच वेगवेगळ्या माध्यमातून प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मतदारांना मतदानासाठी आवाहन केलं.

वाराणसीमधील मान्यवरांचीही पंतप्रधान मोदींनी भेट घेतली.

यावेळी पंतप्रधान मोदींनी मान्यवरांशी सविस्तर संवाद साधला.

मतदारसंघामधील प्रभावशाली व्यक्तींना पंतप्रधानांनी सरकारने केलेली कामं आणि विकासकामांचा पाढा वाचून दाखवला.

एक मोठा मंडप उभारुन त्यामध्ये हा पंतप्रधानांच्या भेटीगाठीचा कार्यक्रमत आयोजत करण्यात आलेला.

यावेळी मोदींसोबत फोटो काढण्याच मोह अनेकांना आवरला नाही.

दरम्यान शुक्रवारी आगमनानंतरचा रोड शो संपल्यावर मोदी अचानक वाराणीस रेल्वे स्थानकावर पोहचले.

पंतप्रधान मोदींनी यावेळी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करुन रेल्वे स्थनकाबद्दलची माहिती घेतली.

पंतप्रधान मोदींनी रेल्वे स्थानकातील कॅण्टीनलाही भेट दिली. तेथील कर्मचाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला.

पंतप्रधान मोदी अधिकाऱ्यांकडून माहिती घेत असतानाच त्यांना पाहण्यासाठी स्थानकात मोठी गर्दी झाली होती.

सर्वच ठिकाणी मोदींच्या कार्यक्रमाला गर्दी झाल्याचं चित्र पहायला मिळालं.

या दौऱ्यामध्ये पंतप्रधानांनी राजकीय प्रचारसंभांबरोबरच अगदी पानावाल्यासोबतही गप्पा मारल्या. मोदींनी या पानवाल्यांच्या ठेल्यावरील बनारसी पानाचा आस्वादही घेतला.

मोदी पानाच्या दुकानावर पोहचल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. पंतप्रधान मोदींनी प्रोटोकॉल मोडत या रस्त्याच्या बाजूच्या दुकानातील पानाचा आस्वाद घेतला.

काशीमधील एका चहाच्या दुकानावर पंतप्रधान मोदींनी चहाचा आस्वाद घेतला.

यावेळी पंतप्रधान मोदींसोबत भाजपाचे काही स्थानिक नेतेही उपस्थित होते.

पंतप्रधान चहा प्यायला आल्याने तेथील स्थानिकांच्या आणि दुकानदाराचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

मोदींचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)