
युपीएससी टॉपर टीना डाबी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकण्याच्या तयारीत आहेत.

टीना डाबी २०१६ राजस्थान कॅडरच्या अधिकारी आहेत.

टीना डाबी २०१३ मधील बॅचचे आयएएस प्रदीप गावंडे यांच्यासोबत लवकरच लग्न करण्याच्या तयारीत आहेत.

टीना डाबी यांनी इन्स्टाग्रामवर प्रदीप गावंडे यांच्यासोबत फोटो शेअर करत यासंबंधी खुलासा केला आहे.

टीना डाबी यांनी इन्स्टाग्रामला फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, “तू दिलेलं हास्य मी परिधान करत आहे”.

प्रदीप गावंडे यांनीदेखील इन्स्टाग्रामला टीना डाबी यांच्यासोबतचा फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये दोघेही एकमेकांच्या हात हातात घेऊन बसलेले दिसत आहेत.

प्रदीप गावंडे यांचा जन्म ९ डिसेंबर १९८० रोजी महाराष्ट्रात झाला आहे. इंस्टाग्राम प्रोफाइलमध्ये त्यांनी मराठी असा उल्लेख केला आहे. त्यामुळे टीना डाबी या महाराष्ट्राच्या सून होणार आहेत.

प्रदीप गावंडे आधी डॉक्टर होते. नंतर त्यांनी युपीएससी उत्तीर्ण केली.

२२ एप्रिलला दोघे जयपूरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत.

टीना डाबी यांनी याआधी २०१८ चे आयएएस अतहर खान यांच्यासोबत लग्न केलं होतं.

अतहर खान २०१६ च्या युपीएससी परीक्षेत दुसऱ्या क्रमांकाचे टॉपर होते.

ट्रेनिंगदरम्यान टीना आणि अतहरमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते.

एका मुलाखतीत टीना यांनी पहिल्या नजरेत आपल्याला अतहरसोबत प्रेम झालं होतं अशी कबुली दिली होती.

धर्माच्या भिंती तोडून २०१८ मध्ये झालेल्या त्यांच्या या लग्नाची बरीच चर्चा रंगली होती.

अनेक हिंदू संघटनांनी या लग्नाला विरोध केला होता. काही लोकांनी याला लव्ह जिहादही म्हटलं होतं. पण टीना यांना याकडे दुर्लक्ष केलं होतं.

लग्नानंतर अतहर खान राजस्थानमध्ये कार्यरत होते.

दोन वर्षांनी २०२० मध्ये त्यांनी सहमतीने तलाक घेतला होता.

पण तलाक झाल्यानंतर अतहर खान यांनी जम्मू काश्मीर कॅडर घेतलं आणि आपल्या राज्यात गेले.

टीना डाबी मूळच्या दिल्लीच्या आहेत.

गेल्या वर्षी त्यांची बहिण रिया डाबीने पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती.

रिया सर्वात कमी वयात युपीएससी उत्तीर्ण करणाऱ्यांपैकी एक ठरली होती. २३ व्या वर्षातच तिने परीक्षा उत्तीर्ण केली.

(Photos: Instagram/Social Media)