-
देशभरामध्ये आज इंधनाचे दर प्रति लिटरमागे ८० पैशांनी वाढले आहे. देशासहीत मुंबईमध्येही मागील नऊ दिवसांमधील आठव्यांदा झालेली दरवाढ आहे.
-
मुंबईत आता पेट्रोल ११५.८८ रुपये लिटर तर डिझेल १००.१० रुपये लिटर दराने मिळत आहे. नऊ दिवसांमध्ये इंधनाचे दर लिटरमागे ५ रुपये ६० पैशांनी वाढलं आहे.
-
एकीकडे इंधनदरवाढीची चर्चा असतानाच दुसरीकडे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संसदेमध्ये घेऊन आलेली हायड्रोजन कार चांगलीच चर्चेत आलीय.
-
पर्यायी इंधनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशिल असणारे गडकरी आज स्वत: थेट इलेक्ट्रीक कार घेऊन संसदेत पोहोचले.
-
गडकरींची ही कार साधीसुधी नसून हायड्रोजनवर चालणारी कार आहे.
-
एकीकडे इंधानचे दर झपाट्याने वाढत असतानाच दुसरीकडे हा हायड्रोजनचा इंधन म्हणून पर्याय किती फायद्याचा ठरु शकतो हे गडकरींच्या या गाडीचं मायलेज पाहिल्यावरच जाणवतं.
-
गडकरी आज ज्या गाडीमधून संसदेमध्ये आले ती जपानमधील टोयोटा कंपनीची गाडी आहे.
-
मिराई असं या गाडीचं नाव आहे. टोयोटा मिराई ही देशातील हायड्रोजनवर चालणारी पहिलीच गाडी आहे.
-
भारतीय रस्त्यांवर तसेच भारतीय हवामानामध्ये हायड्रोजनवर चालणाऱ्या या गाड्या कशा प्रभावी ठरतील यासंदर्भातील चाचण्या सध्या सुरु आहेत.
-
“आत्मनिर्भर होण्यासाठी आम्ही ग्रीन हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करण्याचे प्रयोग करतोय. हा हायड्रोजन पाण्यापासून तयार केला जातो,” असं गडकरींनी या गाडीच्या इंधनाबद्दल एएनआयशी बोलताना सांगितलं.
-
“आता लवकरच आपल्या देशामध्ये ग्रीन हायड्रोजनचं उत्पादन सुरु होईल,” असा विश्वासही गडकरींनी व्यक्त केला.
-
“ग्रीन हायड्रोजनच्या निर्मितीमुळे (इंधनाची) आयात कमी होईल. नवीन नोकरीच्या संधी निर्माण होतील,” असंही गडकरी म्हणाले.
-
हायड्रोजनची निर्यात करणारा देश म्हणून भारताला ओळख मिळावी या उद्देशाने तीन हजार कोटींची गुंतवणूक करुन संशोधन आणि त्यासंदर्भातील इतर प्रयत्न सुरु असल्यंही गडकरी म्हणाले.
-
कोळश्याला पर्यायी इंधन म्हणून ग्रीन हायड्रोनचा वापर होईल असं गडकरी म्हणालेत. “सध्या जिथे जिथे कोळश्याचा वापर होतोय तिथे हायड्रोजनचा वापर केला जाईल,” असं म्हटलं आहे.
-
याच महिन्याच्या सुरुवातील गडकरींनी हायड्रोजनवर आधारित फ्युएल सेल इलेक्ट्रीक व्हेइकलच्या उद्धटनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी या गाडीबद्दल माहिती दिलेली.
-
“टोयोटा ही जपानी कंपनी आहे. त्यांनी मला ही गाडी दिली असून ती ग्रीन हायड्रोजनवर चालते,” असं गडकरींनी म्हटलं होतं.
-
“मी स्वत: ती पर्यायी इंधन म्हणून पायलेट प्रोजेक्टच्या धर्तीवर वापरुन पाहणार आहे,” असं गडकरींनी यावेळी म्हटलं होतं.
-
दिलेल्या शब्दानुसार गडकरी आज स्वत: या गाडीमधून संसदेमध्ये आले तेव्हा सर्वजण या गाडीकडे पाहतच राहिले.
-
गडकरींनीच या महिन्यामध्ये संसदेत बोलताना पुढील काही वर्षांमध्ये इलेक्ट्रीक गाड्या फार स्वस्त होतील असं सांगताना पेट्रोलसाठी तुम्ही १०० रुपये घालवत असाल तर या गाड्यांमुळे तो खर्च १० रुपयांवर हेईल असं म्हटलं होतं.
-
सध्या इंधनाचे भाव आणि मायलेज याचा विचार केला तर सरासरी २० किलोमीटरचा एव्हरेज आणि १०० रुपये लिटर पेट्रोल असं गणित पकडलं तरी आता गाड्या एका किमीसाठी पाच रुपयांचं पेट्रोल खातात असं दिसतं.
-
याच तुलनेत ही हायड्रोजन कार एका किमीच्या प्रवासाठी केवळ दोन रुपयांचं इंधन वापरते असं सांगितलं जात आहे. म्हणजेच पारंपारिक इंधनापेक्षा या इंधनासाठीचा खर्च तिप्पटीने कमी आहे. (सर्व फोटो ट्विटर, एएनआय आणि पीटीआयवरुन साभार)

Mira Road Murder : सरस्वतीची हत्या करणारा मनोज साने दुर्धर आजाराने त्रस्त