
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी गुजरातमधील बनासकांठा येथील अत्याधुनिक डेअरी परिसराचं उद्घाटन केलं. यावेळी पंतप्रधान मोदी हे पांढऱ्या रंगाचं हेल्मेट घालून उद्घाटन करत असल्याचं दिसून आलं.


मोदी हे गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असताना ते या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.

पंतप्रधान मोदींनी बनास डेयरी प्रकल्पाला मंगळवारी भेट दिली तेव्हा त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली.

खरं म्हणजे जगभरामध्ये वेगवेगळ्या जागांवरील कामगारांसाठी वेगवेगळ्या रंगाचे हेल्मेट असतात.

मोदींचं हेल्मेटही याच कलर कोडचा एक भाग होता.

असं पंतप्रधान मोदींनी घातलेलं पांढरं हेल्मेट का वापरलं जातं, ते कुठे वापरतात आणि इतर कोणत्या रंगाचे हेल्मेट असतात?

आता इतर रंगाच्या हेल्मेटचा अर्थ काय असतो जाणून घेऊयात.


कारपेंटर म्हणजेच सुतार आणि इतर टेक्निकल ऑप्रेटर्सलाही निळ्या रंगाचं हेल्मेट दिलं जातं.

तर हिरव्या रंगाचं हेल्मेट हे सुरक्षा अधिकारी वापरतात.

या वेगवगेळ्या रंगांच्या हेल्मेटवरुन कर्मचारी पदानुसार कोणत्या स्तरावरील आहेत हे समजू शकतं.

आग लागल्यानंतर घटनास्थळी धाव घेणाऱ्या फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांचं हेल्मेट हे अनेक देशांमध्ये लाल रंगाचं असतं. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीस ठावणाऱ्या बचाव पथकातील लोकांनाही लाल हेल्मेट दिली जातात. हे हेल्मेट आत्पकालीन परिस्थिती अधोरेखित करतं.

भारतामध्ये मात्र अनेक राज्यांमध्ये फायर ब्रिगेडचे कर्मचारी पिवळ्या रांगाचे हेल्मेट वापरतात. काही ठिकाणी गडद निळ्या रंगाचं हेल्मेटव ापरलं जातं.

ब्राउन म्हणजेच चॉकलेटी रंगाचं हेल्मेट हे वेल्डींग करणाऱ्या लोकांकडून वापरलं जातं. किंवा वर्किंग स्टेशन म्हणजेच कामाची जाग ही अधिक तापमान असणारी असेल (एखादी भट्टी वगैरे) तर त्या ठिकाणी चॉकलेटी हेल्मेट वापरलं जातं.

बांधकाम सुरु असणाऱ्या ठिकाणी दोन प्रकारचे हेल्मेट असतात, पांढरं आणि पिवळं.

पिवळ्या रंगाचं हेल्मेट वापरलं जाण्यामागील कारण म्हणजे व्हिजिबिलीटी.

पिवळा रंग फार दूरुन दिसतो म्हणून त्याचा उंच इमारतींच्या बंघकामादरम्यान हेल्मेटसाठी वापर केला जातो.

आता सर्वात शेवटी आपण येऊयात पंतप्रधानांनी घातलेल्या पांढऱ्या रंगाच्या हेल्मेटकडे

मोदींनी हे हेल्मेट पोटॅटो नगेट्स फॅक्ट्रीला भेट देताना वापरलं होतं. म्हणजेच बटाट्यापासून नगेट्स बनवले जातात त्या ठिकाणी पहाणी करताना मोदींनी हे हेल्मेट वापरलेलं.

फॅक्ट्रीमध्ये शिरण्याआधी माहिती घेताना मोदींच्या डोक्यावर हेल्मेट नव्हतं.

एखाद्या कंन्स्ट्रक्शन साईटवर किंवा कारखान्यामध्ये एखादी व्यक्ती पांढऱ्या रंगाचं हेल्मेट घातल्याचं दिसून आल्यास ती व्यक्ती सुपरवायझर, इंजीनिअर किंवा व्यवस्थापक असू शकतो.

अशाप्रकारे पांढऱ्या रंगाचं हेल्मेट कंन्स्ट्रक्शन साईटवर वापरण्याचा अधिकार काही मोजक्या लोकांना असतो.

म्हणजेच पंतप्रधान मोदी यांनी बटाट्यावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याची पहाणी केली तेव्हा ते तेथील सर्वात महत्वाचे व्यक्ती असल्याने त्यांना पांढऱ्या रंगाचं हेल्मेट देण्यात आलेलं.

मोदी हे कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे तर होतेच शिवाय ते पंतप्रधान असल्याने त्यांना पांढऱ्या रंगाचं म्हणजेच सुपरवायझर्सचे हेल्मेट देण्यात आलेले. (सर्व फोटो रॉयटर्स, पिक्साबे, ट्विटर आणि पीटीआयवरुन साभार)