-
सध्या आपल्या नव्या राजकीय भूमिकेमुळे चर्चेत असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काही दिवसांपूर्वी आजोबा झाले.
-
५ एप्रिल २०२२ रोजी राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली अमित ठाकरे यांना पुत्ररत्न प्राप्ती झालीय.
-
तर, सचिन मोरे यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून राज ठाकरेंच्या नातवाचे नाव सांगितले आहे.
-
‘किआन अमित ठाकरे’ असे त्यांच्या नातवाचे नाव आहे.
-
या आधी सचिन मोरे यांनीच फेसबूकवर पोस्ट शेअर करत “आमचे साहेब आजोबा झाले,” अशी पोस्ट केली होती. तसेच त्यांनी, “युवराजांचं आगमन” असं लिहित राज ठाकरेंना नातू झाल्याचंही म्हटलं होतं. सचिन यांनी अमित ठाकरेंचंही अभिनंदन केल होतं.
-
सचिन मोरे यांनी राज ठाकरेंच्या नातवाचे परिवासरासोबतचे फोटो शेयर केले आहेत.
-
पहिल्यांदाच राज ठाकरे यांचा नातवाचा चेहरा मीडिया समोर आला आहे.
-
या फोटोमध्ये आजोबा राज ठाकरे आनंदीत दिसत आहेत.
-
‘prokerala.com’ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, किआन हे हिंदू नाव आहे. हे संस्कृत नाव असून देवाची कृपा असा त्याचा अर्थ आहे.
-
‘dvaita.org’ या वेबसाईटनुसार किआन हे विष्णू देवाचं नावं आहे, तर देवाची एक झलक असाही त्याचा अर्थ आहे.
-
राज ठाकरेंसोबत त्यांचा पत्नी शर्मिला ठाकरे देखील आनंदी दिसत आहेत.
-
अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचे २०१९ साली लग्न झाले.

Bill Gates on AI and Jobs : बहुतेक कामांमध्ये AI घेईल माणसांची जागा, फक्त ‘या’ तीन नोकऱ्या आहेत सुरक्षित : बिल गेट्स