
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा क्रिकेटविश्वापासून दूर असला तरी तो नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो.

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही लाइमलाइटपासून लांब असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.

नुकतंच सचिन तेंडुलकरच्या संपूर्ण कुटुंबाने एका जवळच्या नातेवाईकाच्या लग्नाला हजेरी लावली.

या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या लग्नसोहळ्यात सारा ही पारंपारिक मराठमोळ्या वेषात दिसली होती.

यावेळी साराने कपाळावर छान चंद्रकोर, नाकात नथ, गळ्यात छान दागिने परिधान केले होते.

साराने यावेळी निळ्या रंगाची साडी नेसली होती. तसेच तिने केसात छान गजराही माळला होता.

सारा तेंडुलकरच्या हातामध्ये एक कलशही दिसत होता.

साराचे पहिल्यांदाच साडीमधले फोटो समोर आले आहेत.

साराने लग्नाच्या इतर कार्यक्रमांमध्ये पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यावेळी ती इतर नातेवाईकांची भेट घेताना दिसत आहे.

या लग्नात सचिन तेंडुलकर, त्यांची आईदेखील पारंपारिक वेषात दिसली होती.

यावेळी सचिनचा नवविवाहित जोडप्यासह एक फोटोही समोर आला आहे.

मुंबईच्या जे डब्ल्यू हॉटेलमध्ये हा लग्नसोहळा पार पडला होता.

या लग्नाचे फोटो समीर वसईकर यांनी त्यांच्या फेसबुकवर शेअर केले होते. (समीर वसईकर/ फेसबुक)