
‘फुल’राणी सायना नेहवाल म्हणजे भारतीय क्रीडा क्षेत्रातील युगप्रवर्तक.
भारतीय स्टार बॅडमिंटनपटू सायनाने चारधाम यात्रेतील केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
सायना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते.
केदारनाथ मंदिर परिसरातील अनेक फोटो सायनाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
६ मे २०२२ रोजी केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले होते.
उन्हाळ्यात उत्तराखंडमध्ये चार धामच्या (गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ) यात्रेला सुरूवात होती.
गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ ही चारही ठिकाणे १०००० फुटांपेक्षा अधिक उंच आहेत.
गंगोत्री आणि बद्रिनाथपर्यंत गाडी रस्ता आहे, मात्र यमुनोत्री आणि केदारनाथला चालत जावे लागते किंवा घोड्यावरून जावे लागते.
केदारनाथ धाममध्ये प्रथमच आदिगुरू शंकराचार्यांच्या समाधीत शंकराचार्यांच्या मूर्तीचे दर्शनही भाविकांना पाहायला मिळणार आहे.
उत्तराखंडमध्ये जोरदार पावसाने थैमान घातल्याने केदारनाथ यात्रा तूर्त थांबविण्यात आली आहे.
हवामान बदलल्याने केदारनाथ देवस्थानाकडे जाणाऱ्या यात्रेकरूंना थांबविण्यात आले आहे.
(सर्व फोटो सौजन्य : सायना नेहवाल / इन्स्टाग्राम)