
शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू आहे.

शिंदेंच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे.

विधान परिषद निवडणुकीनंतर समर्थक आमदारांसह एकनाथ शिंदेंनी गुजरातमधील सूरतची वाट धरली.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिंदे आणि आमदारांनी आपला मुक्काम गुवाहाटीला हलवला.

शिंदेंसोबत शिवसेनेचे ३७ आणि अपक्ष ९ आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

आमदारांसोबत शक्ती प्रदर्शन करतानाचे एकनाथ शिंदेंचे गुवाहाटी हॉटेलमधील फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

एकनाथ शिंदे आता काय निर्णय घेणार यावर महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या एकनाथ शिंदे यांच्या संपत्तीवर एक नजर टाकूया.

एकनाथ शिंदेंकडे ७.५ कोटींची मालमत्ता आहे.

स्कॉर्पिओ, इनोवा, बलेनो या महागड्या गाड्या शिंदेंच्या ताफ्यात आहेत.

या गाड्यांची किंमत आठ ते १७ लाखांच्या घरात आहे.

एकूण ७० लाख किंमतीच्या गाड्यांचे शिंदे मालक आहेत.

शिंदेंकडे तीन लाख किंमतीचे ११० ग्रॅम सोने आहे.

तर त्यांच्या बायकोच्या नावावर सुमारे १५ लाख रुपयांचे ४८० ग्रॅम सोने आहे.

शिवसेनेचा आणि शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात त्यांचे दोन बंगले आहेत.

या दोन्ही बंगल्यांची किंमत सुमारे २ कोटींच्या घरात आहे.

याशिवाय ठाण्यातील किसान नगर चाळीत त्यांच्या मालकीचे घरदेखील आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेट मध्येही शिंदेंच्या नावावर प्रॉपर्टी आहे.

शिंदेंनी घर आणि गाड्यांसाठी सुमारे ८० लाखांचं कर्ज घेतलेलं आहे.

तर शिंदेंच्या पत्नीच्या नावावर ८३ लाखांचं कर्ज घेतलेलं आहे. (सर्व फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)

(हेही वाचा : राणे, राज ठाकरे अन् आता शिंदे… शिवसेनेच्या बंडाळीचा इतिहास )