
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आणि श्रीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अतहर आमिर खान पुन्हा लग्न करणार आहेत.

यापूर्वी अतहर आमिर खानने आयएएस टॉपर टीना दाबीसोबत लग्न केले होते, मात्र हे नाते फार काळ टिकले नाही.

२०१५ मध्ये, दिल्लीच्या टीना दाबीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवला होता.

त्याच वर्षी जम्मू आणि काश्मीरच्या अतहर आमिरने यूपीएससीमध्ये दुसरा क्रमांक मिळवला होता.

मसुरीमध्ये प्रशिक्षणादरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि प्रशिक्षण संपल्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी लग्न केले.

तथापि, हे लग्न फार काळ टिकले नाही आणि २०२१ मध्ये टीना आणि अतहर वेगळे झाले.

आता, काश्मीरमधील डॉक्टर मेहरीन काझी त्यांच्याशी अतहर आमिर खान लग्नगाठ बांधणार आहेत.

काश्मीरमधील अनंतनाग येथील रहिवासी आयएएस अतहर आमिर खान आणि डॉ. मेहरीन काझी यांनी शनिवारी रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या नात्याचा खुलासा केला.

दोघांचा साखरपुडा झाला असून मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉक्टर मेहरीन या श्रीनगरमधील लाल बाजार येथील रहिवासी आहेत.

डॉ. मेहरीन काझी आजकाल राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीतील राजीव गांधी कर्करोग संस्था आणि संशोधन केंद्रात कार्यरत आहेत.

मेडिको असण्यासोबतच त्या फॅशन इंडस्ट्रीतही सक्रिय आहे.

त्या महिलांशी संबंधित ब्रँडचा प्रचार करतात. इंस्टाग्रामवर त्यांचे २ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

मेहरीन मेडिसिनमध्ये एमडी आहे. त्यांनी पंजाबमधील फरीदकोट, दिल्लीतील आंबेडकर विद्यापीठ, यूके आणि जर्मनी येथे शिक्षण घेतले आहे.

मेहरीन आणि अतहर बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहे.

शनिवारी रात्री उशिरा खान यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर या गोष्टीची पुष्टी केली. त्याचवेळी डॉ. मेहरीन काझी यांनीही त्यांचे नाते सर्वांसमोर आणले आहे.

असे मानले जाते की या जोडप्याचा मे महिन्यातच साखरपुडा झाला होता आणि या वर्षी ऑक्टोबरमध्ये ते लग्न करणार आहेत.

दुसरीकडे, आयएएस अतहर आमिरची पहिली पत्नी टीना दाबीनेही घटस्फोटानंतर आयएएस प्रदीप गावंडे यांच्याशी लग्न केले.

प्रदीप राजस्थानच्या पुरातत्व विभागाचे संचालक आहेत. टीना आणि प्रदीप दोघेही राजस्थान केडरमध्ये कामकाज पाहत आहेत.

(सर्व फोटो : इन्स्टाग्राम आणि फेसबुक)